- कोरोणाच्या संकटात जिबगांव परीसरात जणतेचे बेहाल
- उपचारा साठी जावे लागते तालुक्याच्या ठीकाणी
सावली तालुक्याच्या ठिकानी असलेल्या उपरुग्णालयाचा मोठा वाटा राहीला होता. मात्र अनेक वर्षांपासून जिबगांव येथील प्रा. आरोग्य केंद्र अंगणवाडी ईमारतीच्या दोन छोट्याशा रुमांमध्ये स्थलांतर करण्यात आले. मात्र त्या ठिकानी वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी याना मोठ्या अडचणींचा सामना करून आरोग्य सेवा देताना दिसुन येत आहेत. तेव्हा सामाजीक कार्यकर्ता राकेश गोलेपल्लीवार यानी माजी आमदार अतुल देशकर यानी सावली ब्रम्हपुरी क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत असताना जिबगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र च्या ईमारतीचे बांधकाम करण्यासाठी पाठपुरवठा केले असता माजी आ मा अतुल देशकर यानी दखल घेत जिल्हाधिकारी चंद्रपुर यांचे सोबत स्वतः बसुन स्मशानभुमीची सात एकर जागे पैकी तिन एकर जागा प्रा.आरोग्य केंद्र साठी राखीव करून घेतली. त्यानंतर एक कोटी विस लाख रुपये नीधी मंजुर करण्यात आले होते. पंरतु ती निधी इमारत बांधकामासाठी कमी पडत होती. त्यामुळे माजी आ. सुधिरभाऊ मुनगंटीवार चंद्रपुर जिल्हाचे पालकमंत्री व अर्थ मंत्री असताना त्यांचेकडे सामाजीक कार्यकर्ता राकेश गोलेपल्लीवार यानी पाठपुरावा केला असता अंदाजे तिन कोटी छेचाळीस लाख सत्ताविस हजार रुपये मंजूर करून घेण्यात आले. त्यानंतर आलेल्या निधी खर्च करून बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र आरोग्य सेवा मिळावी म्हणून ईमारती बांधकाम करण्यात आली. परंतु ईमारतीचे बांधकाम पुर्ण होऊनही ईमारत धुळ खात असल्याने ईमारतीचे लोकार्पण सोहळा पार पाडण्यात यावी व उत्तम सेवा मिळावी अशी मागणी होत आहे. अशातच जिबगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ईमारतीची पाहणी करण्यासाठी अनेक नेते व अधिकारी यांनी वेळोनवेळी भेट देत प्रा आरोग्य केंद्र च्या ईमारतीची पाहणी करीत असतात पन प्रा आरोग्य केंद्र ईमारतीचा लोकार्पण सोहळा केव्हापार पडणार आहे याचे कडे कुणाचे लक्ष वेदत नसल्यामुळें मात्र जिबगांव परिसरातील जनता त्रस्त आहे एकीकडे कोरोनाची लाट येत आहे तर दुसरी कडे प्रा आरोग्य धुकखात पडली असुन सर्वाचे विसर पडले आहेत याकडे लक्ष कोन देणार व आरोग्य प्रा इमारतीचे लोकार्पण सोहळा पार पाडुन आयोग्य सेवा मीळणार का असे प्रशन्न उपस्थित होत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.