Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालयासाठी विद्युत जनरेटर खरेदीच्‍या प्रस्‍तावाला मान्‍यता द्यावी - आ. सुधीर मुनगंटीवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर येथे विद्युत जनरेटर खरेदीच्‍या प्रस्‍तावाला त्...

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर येथे विद्युत जनरेटर खरेदीच्‍या प्रस्‍तावाला त्‍वरीत मान्‍यता देण्‍याची मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वैद्यकिय शिक्षण मंत्री ना. अमित देशमुख यांच्‍याकडे केली आहे.

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय ही अतिशय महत्‍वाची आरोग्‍य संस्‍था असून वैद्यकिय शिक्षणाचे प्रशस्‍त दालन आहे. चंद्रपूर, गडचिरोली या जिल्‍हयातील रूग्‍ण याठिकाणी उपचारार्थ येत असतात. या महाविद्यालय व रूग्‍णालयासाठी ४० लाख रू. किंमतीचा विद्युत जनरेटर खरेदीचा प्रस्‍ताव महाविद्यालय प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे व शासनाकडे मंजूरीसाठी सादर केला आहे. या प्रस्‍तावाला त्‍वरीत मान्‍यता देण्‍याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वैद्यकिय शिक्षण मंत्र्यांसह सचिव वैद्यकीय शिक्षण व संचालक वैद्यकिय शिक्षण यांच्‍याकडे केली आहे. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top