Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: गॅस वितरणातील अडचणींविरोधात राजुरा शहरात जोरदार निदर्शने
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वंचित बहुजन आघाडीचा तहसील कार्यालयावर मोर्चा आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. ८ एप्रिल २०२६) -         केंद्र व राज्य शासनाच्या गॅस सिल...
वंचित बहुजन आघाडीचा तहसील कार्यालयावर मोर्चा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. ८ एप्रिल २०२६) -
        केंद्र व राज्य शासनाच्या गॅस सिलेंडर संदर्भातील धोरणांविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर राजुरा शहरातही या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

        तालुका अध्यक्ष विजय जुलमे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला. “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर?” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. गॅस टंचाईमुळे सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन, रोजगार आणि स्वयंपाकघरातील अडचणी वाढल्याचे आंदोलनकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले.

        या आंदोलनात जिल्हा सदस्य सच्चिदानंद रामटेके, तालुका उपाध्यक्ष मुरलीधर ताकसांडे, उपाध्यक्ष ऋषी रायपुरे, तालुका महासचिव नागोराव पडवेकर, बाळू जुलमे, मारोती रामटेके, प्रभुदास वनकर, शंकर दुर्गे, परशुराम वाघमारे, दिलीप जुलमे, मारोती घागरगुंडे, दिलीप भसारकर, चरणदास झाडे, विठ्ठल धोटे, शंकर झाडे, कवडूजी वाघमारे, गौतम देवगळे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

        सध्या अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असून काही ठिकाणी दुकाने बंद असल्याचे चित्र आहे. काही भागात सिलेंडरची किंमत आदिक घेतली जात आहे. शासनाकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला जात असला तरी तो वास्तवाशी विसंगत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

        आंदोलनादरम्यान तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये कृत्रिम टंचाई थांबवणे, काळाबाजार रोखणे, गॅस वितरणातील विलंब कमी करणे, दोषींवर कारवाई करणे, विद्यार्थ्यांसाठी कम्युनिटी किचन सुरू करणे, परिस्थितीबाबत स्पष्ट माहिती देणे, केवायसीअभावी गॅस नाकारणे थांबवणे आणि उज्ज्वला योजनेचे ऑडिट करणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
#RajuraNews #GasShortage #LPGCrisis #VBAProtest #MaharashtraNews #GasCylinderIssue #BlackMarketLPG #UjjwalaYojana #NagpurRegionNews #IndiaNews #BreakingNews #RajuraProtest #VanchitBahujanAghadi #LocalNewsIndia #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top