Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रोजगार हमी योजनेत भागीदारीसाठी स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - शासनाच्या दि. 13 जानेवारी, 2021 च्या परिपत्रकान्वये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी ...

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
शासनाच्या दि. 13 जानेवारी, 2021 च्या परिपत्रकान्वये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये सिएसओ, एफपीओ, सीबीओ, एनजीओ इत्यादी स्वयंसेवी संस्थांच्या अखर्चिक भागीदारी बाबत निर्देश असून त्याअनुषंगाने विहित बाबींची पुर्तता करणाऱ्या इच्छुक स्वयंसेवी संस्थांकडून 3 मार्च 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज सादर करण्यासाठी  संबंधीत संस्थेची विना आर्थिक सहाय्याचे काम करण्याची तयारी असावी,  शासकीय क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असावा, जलसंधारण किंवा सामुदायिक विकासाचे नियोजन क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असणाऱ्या प्राधान्य देण्यात येईल. अशा स्वयंसेवी संस्थांचे प्रशासकीय संघटन आवश्यक त्या जिल्हयात असावे. सदर स्वयंसेवी संस्था निती आयोगाच्या एनजीओ पोर्टलवर नोंदणीकृत असावी.

उपरोक्त निकषांची पुर्तता करणाऱ्या स्वयंसेवी संस्थानी दि. 03 मार्च 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत उपजिल्हाधिकारी (रोहयो) शाखा जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावेत.  स्वयंसेवी संस्थांची निवड प्राप्त अर्जानुसार प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करण्यात येणार असून मुलाखतीचा वेळ व दिनांक स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे. 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top