Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: लक्कडकोट नाक्यावर गांजासह अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
एका आरोपीला अटक अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - राजुरा तालुक्यातील महाराष्ट्र - आंध्र सीमेवरील लक्कडकोट वन उपज तपासणी न...

  • एका आरोपीला अटक
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील महाराष्ट्र - आंध्र सीमेवरील लक्कडकोट वन उपज तपासणी नाक्यावर एका कार मधून दीड लाखाचा गांजा जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दुसरा आरोपी फरार झाला असून राजुरा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  

दिनांक 21 फेब्रुवारी ला दुपारी तीन वाजताचे दरम्यान तेलंगणा कडून मारुती कार क्रमांक एमएच 11 / एके 7318 आली. लक्कडकोट नाक्यावर थांबवून या कारची तपासणी केली असती त्यात 41 किलो 180 ग्राम ओलसर गांजा आढळला. या गांजाची किंमत 1 लाख 64 हजार 720 रुपये असून कारसह एकूण 11 लाख 74 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राजुरा पोलिसांनी गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 च्या कलम 20 व 22 नुसार गुन्हा दाखल करून आरोपी वाहन चालक दिनेश निपेन दास, राहणार साईबाबा वॉर्ड, बल्लारपूर याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले. दुसरा आरोपी सुनील हा फरार झाला. राजुरा पोलिस ठाण्यात एनडीपीएस अधिनियमाच्या कलम 20 व 22 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केलेल्या आरोपीला न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. 

ही कारवाई पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे व उपविभागीय पोलिस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार चंद्रशेखर बहादूरे, उपनिरीक्षक सुनील झुरमुरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश गोडसे यांनी केली. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top