Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विनयभंग प्रकरणी आरोपीला तीन वर्षाची शिक्षा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी जिवती तालुक्यातील राहपली येथील युवकाला चंद्र...

अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी जिवती तालुक्यातील राहपली येथील युवकाला चंद्रपूर सत्र न्यायालयाने तीन वर्षाची शिक्षा व दोन हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. 7 एप्रिल 2019 ला ही घटना घडली होती.  

टेकामांडवा पोलिस ठाणे अंतर्गत येणार्‍या राहपली येथे एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपीवर पास्को अंतर्गतही गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक रेखा काळे यांनी करून चंद्रपूर जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाचा निकाल लागला असून सत्र न्यायाधीश मा. अनुराग दीक्षित यांनी पास्को कलमा नुसार आरोपी राहुल जोंधळे, वय 23, राहणार राहपली याला एक वर्ष सजा व एक हजार रुपये दंड आणि विनयभंग प्रकरणी दोन वर्ष सजा व एक हजार रुपये दंड अशी एकूण तीन वर्षाची शिक्षा व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी जिल्हा सरकारी अभियोक्ता अँड. महाजन यांनी काम पाहिले. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top