- पोलिसाचा कारमध्ये तरुणीवर अत्याचार
- पोलिसाने २७ वर्षीय तरुणीवर कारमध्ये केला अत्याचार
- मोबाइलद्वारे काढली चित्रफित
- सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार केले शारीरिक शोषण
नागपूर -
पोलिसाने २७ वर्षीय तरुणीवर कारमध्ये अत्याचार केला. त्याची मोबाइलद्वारे चित्रफित काढली. ती सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार तिचे शारीरिक शोषण केले. ही घटना गिट्टीखदान भागात उघडकीस आली. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी पोलिस कर्मचाऱ्याविरूद्ध अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
रिजवान उस्मान शेख (२८, रा. पोलिस वसाहत, पोलिस लाइन टाकळी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे असून तो पोलिसांच्या मोटर वाहन विभागात कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही २७ वर्षीय तरुणी उच्चशिक्षित आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी एका मैत्रिणीच्या माध्यमातून तिची रिजवानसोबत ओळख झाली. त्यानंतर दोघे सतत व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करायला लागले. रिजवानने तरुणीला वर्धा मार्गावर भेटायला बोलाविले. तिथे कारमध्येच तिच्यावर अत्याचार केला. काढलेली चित्रफित, छायाचित्र आई-वडिलांना दाखविण्याची धमकीही त्याने तरुणीला दिली.
दरम्यान, रिजवानने तिला लग्नाचे आमिष दाखविले. आई-वडिलांना भेटण्यासाठी रिजवान तिला घेऊन जबलपूर येथे गेला. तेथेही त्याने तिच्यावर अत्याचार केला. यासह पुणे येथेही शारीरिक शोषण केले. काही दिवसांपूर्वी रिजवानने लग्नास नकार दिला. तरुणीने गिट्टीखदान पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. रिजवानने तरुणीची कार हडपल्याचीही माहिती आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.