श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि सरकारने लाॅकडाऊन जाहीर केले. लाॅकडाऊन दरम्यान गोरगरीबांना घराबाहेर जावु नका असे आवाहन करत सरकारमधील प्रत्येक मंत्री गरीबांना न्याय देण्याची भाषा करीत होते. गरीबांना न्याय देणे तर दुरच मात्रा याच लाॅकडाऊनच्या काळातील गरीबांची विजबीले माफ करण्याचे आठवण या सरकारला नाही. महाआघाडी सरकारला हा विस्मरणाचा रोग झाला आहे. जनता आर्थिक अभावामुळे आधिच संकटात असतांना सरकार पून्हा त्यांच्यावर वाढीव विजबीलाचा भार लादुन त्यांना त्रास्त करीत आहे अशी टीका पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली.
चंद्रपूर येथील स्थानीक वरोरा नाका चैकात भाजपातर्फे लाॅकडाऊनच्या काळातील गरीबांची विजबीले माफ करण्याच्या मागणीसाठी ग्रामिण भागातील शेतकरी व ग्रामस्तांच्या उपस्थितीत विजबील होळी आंदोलन करण्यात आले. यावेळी राजु घरोटे, भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, नरेंद्र जिवतोडे, प्रविन ठेंगने, राजु येले, सचिन डोहे, संजु ढाकने, निलकंठ निखाडे, सुधीर बोढाले, मारोती बोढाले, शंकर बालपने, संदीप निमकर, रवि डोंगे यांच्यासह ग्रामिण भागातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अहीर यांनी ग्रामिण भागात वाढीव विजबिलामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष असुन सरकारने वाढीव विजबिलाची आकारनी रद्द न केल्यास ग्रामस्थांच्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल आणि भारतीय जनता पार्टीतर्फे हा असंतोष संघटीत करून सरकारला वाढीव विजबिलाची आकारनी रद्द करण्यासाठी अधिक तिव्र आंदोलन करून सरकारला वाढीव विजबिल आकारनी रद्द करण्यासाठी बाध्य केल्यशिवाय राहणार नाही असा इशारा अहीर यांनी दिला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.