Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: एड.यादवराव धोटे महाविद्यालयाच्या निशांत रासेकरचे जेईई एडव्हान्स परिक्षेत सुयश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वैभव वैद्य - शहर प्रतिनिधी राजुरा - शहरातील नामांकित एड.यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी द्वारा संचालित एड.यादवराव धोटे महाविद्यालयातील निशांत ...

वैभव वैद्य - शहर प्रतिनिधी
राजुरा -

शहरातील नामांकित एड.यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी द्वारा संचालित एड.यादवराव धोटे महाविद्यालयातील निशांत अनंत रासेकर या विद्यार्थ्याने  बीटेक प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई ॲडव्हान्स २०२० या परीक्षेत एकूण दीड लाख उपस्थित परिक्षार्थी तसेच देशातील ४३ हजार २०४ पास झालेल्या परीक्षार्थांपैकी ६८४८ तर राज्यात ११९४ हा क्रमांक घेऊन यशाचा मानकरी ठरला. निशांतने एड.यादवराव धोटे महाविद्यालयाची मान तर उंचावलीच तसेच आयटी मध्ये आपले स्थान निश्चित केले.

निशांत हा मूळचा गडचांदुर येथील रहिवासी असून वडील शिक्षक तर आई गृहिणी आहे. यापूर्वी निशांतने बारावी बोर्डाच्या परीक्षेतही महाविद्यालयात प्रथम येऊन मानाचा तुरा रोवला होता. हे येथे विशेष. सलग दुसऱ्यांदा बाजी मारल्यामुळे सर्वत्र त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, इतकेच नव्हे तर निशांतला चेस हॉलीबॉल क्रिकेट व गायनाची सुद्धा आवड आहे. त्याने आपल्या घवघवीत यशाचं श्रेय आई-वडील, नातेवाईक व महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद यांना दिले आहे. तसेच निशांत च्या पुढील भविष्य करिता संस्थेचे अध्यक्ष सुधीर धोटे, माजी आमदार तथा संस्थेचे उपाध्यक्ष एड.संजय धोटे, कोषाध्यक्ष सतीश धोटे, सचिव एड. अर्पित धोटे, संस्थेचे संचालक मोहन धोटे, महाविद्यालयाचे प्राचार्य दिनेश दुर्योधन, पर्यवेक्षिका सुप्रिया गोंड, परीक्षा विभाग प्रमुख इर्शाद शेख व संपूर्ण प्राध्यापक वृंद यांनी भरभरून कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top