रक्तदान - जीवनदानाचे संकल्प! सामाजिक कार्यात जनसहभाग!
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने व आशिष माशीरकर यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबिरात जनतेचा मोठा सहभाग
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २५ जुलै २०२५) -
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस चंद्रपूर मतदार संघातील आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला. आमदार किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा नेते आशिष माशीरकर यांनी देवाळा महाकालीनगरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात अनेक नागरिकांनी सहभाग घेत मोलाचे योगदान दिले.
आपल्या मनोगतात भाजपा नेते आशिष माशीरकर यांनी "रक्तदान हे सर्वदानांमध्ये श्रेष्ठ आहे" असे सांगून या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी स्पष्ट केले की, रक्तदान हे नुसतेच दुसऱ्यांना जीवनदान देणारे नसून ते स्वतःच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. या कार्यक्रमात भाजपा नेते प्रशांत ताजने, कमलाकर येडमे, रवी उपरे, विशाल रामटेके, सुनील मुळे, केशव उपरे, चापलेजी, डॉ. सुविधा ताजने, वृंदाताई काळे, नंदाताई मुळे, ज्योतीताई मुळे, तसेच अनेक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.