Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: दुर्गापुर ग्रापं कर्मचाऱ्याचे थकीत वेतन, भविष्य निर्वाह निधी तात्काळ खात्यात जमा करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दोषी सचिव यांची बदली व निलंबनाची कार्यवाही करा! शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांची जिप मुख्य कार्यपालन अधिकारी यांना निवेदनाद्...
दोषी सचिव यांची बदली व निलंबनाची कार्यवाही करा!
शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांची जिप मुख्य कार्यपालन अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
चंद्रपूर (दि. २२ ऑगस्ट २०२३) -
        दुर्गापुर ग्रा.पं. कर्मचाऱ्याचे गेल्या 10 महिन्याचे अर्थात ऑक्टोबर 2022 पासून मासिक वेतन देण्यात आलेले नसून कर्मचाऱ्याचे 18 महिन्यापासून भविष्य निर्वाह निधी कपात करुन देखील कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा न करण्यात आल्यासंदर्भात ग्रापं चे कर्मचाऱ्यांनी दि. 17/08/2023 पासून असहकार आंदोलन केले. सदर विषयाची तात्काळ दखल घेवून दोषी ग्रापं चे सचिव यांची बदली व निलंबनाची कार्यवाही करुन ग्राम पंचायत, कर्मचाऱ्याचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात येण्याची मागणी शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांची जिप मुख्य कार्यपालन अधिकारी जॉन्सन व उपमुख्य कार्यपालन अधिकारी कलोड़े यांना प्रत्यक्ष भेट घेवून करण्यात आली. (Shiv Sena Chandrapur taluka chief Santosh Parkhi's request to the ZP Chief Executive Officer through a statement)

        ग्राम पंचायत दुर्गापुर ने कर्मचाऱ्याचे नियमित वेतन देण्याचे नियोजन न केल्यामुळे गेल्या 10 महिन्याचे मासिक वेतन थकीत ठेवून सर्व कर्मचाऱ्याचे 18 महिन्यापासून भविष्य निर्वाह निधी कपात करुन देखील तो ऑक्टोबर 2022 पासून ते जुलै 2023 पर्यंतचा भविष्य निर्वाह निधी कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आला नाही. कर्मचाऱ्याचे वेतन वेळेवर करुन त्यांच्या भविष्य निर्वाह निधी दरमहा नियमित भरणे आवश्यक असताना सुद्धा सचिव नी भरला नाही. आज सर्व ग्राम पंचायत कर्मचारी यांच्यावर उपासमारीची पाळी आली असून भविष्यात त्यांच्या हातून अनुचित प्रकार देखील घडू शकतो असा आरोप शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी लावला आहे. (aamcha vidarbha) (durgapur) (chandrapur)
22 Aug 2023

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top