Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: करूणा गावंडे - जांभुळकर यांना जिल्हा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
करूणा गावंडे - जांभुळकर यांना जिल्हा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क राजुरा - चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण व...
करूणा गावंडे - जांभुळकर यांना जिल्हा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग द्वारे दिला जाणारा मानाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार राजुरा पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आर्वी येथे भाषा विषय शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या करुणा गावंडे-जांभुळकर यांना नुकताच शिक्षक दिनी (५ सप्टेंबरला) प्रदान करण्यात आला. जिप चंद्रपूर येथील कन्नमवार सभागृहात हा सोहळा थाटात पार पडला. 
कार्यक्रमाला उपस्थित आमदार किशोर जोरगेवार, जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकर यांच्या शुभहस्ते दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक दीपेंद्र लोखंडे, प्राचार्य धनंजय चाफले, उप मुख्याधिकारी श्याम वाखर्डे, वित्त अधिकारी मातकर तसेच विभागप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देऊन कुटुंबियासमवेत सन्मानित करण्यात आले. करुणा गावंडे - जांभूळकर यांना शैक्षणिक, सामाजिक कार्याबद्दल विविध संस्थेकडून राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम, तंबाखूमुक्त शाळा व या उपक्रमात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविला. महाराष्ट्रातील पहिले तंत्रस्नेही शिक्षिका संमेलनाचे राहुरी, अहमदनगर येथे आयोजन करून उपस्थित सर्व शिक्षिकांचा सन्मान केल्याबद्दल "महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये झालेली नोंद तसेच स्वनिर्मित 300च्या वर शैक्षणिक व्हिडीओ युट्यूब ला अपलोड करून विद्यार्थ्यांच्या अध्ययनात त्यांनी सुलभता निर्माण केली.  या त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे श्रेय त्यांचे पती विजयकुमार जांभुळकर, त्यांचे विद्यार्थी, अधिकारी व सहकारी शिक्षकवृंद यांना दिले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top