Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राष्ट्रीय लोक न्यायालयात ९६ प्रकरणांचा निपटारा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राष्ट्रीय लोक न्यायालयात ९६ प्रकरणांचा निपटारा ६.३५ लाखांची तडजोड आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क राजुरा - तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालयात मह...
राष्ट्रीय लोक न्यायालयात ९६ प्रकरणांचा निपटारा
६.३५ लाखांची तडजोड
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालयात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या मार्गदर्शनानुसार तालुका विधी सेवा समितीच्या वतीने राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले. यात 958 प्रकरणा पैकी 96 प्रकरण निकाली काढण्यात आली. यामध्ये 6 लाख 35 हजार 227 रक्कमेची तडजोड करण्यात आल्याने वादी व प्रतिवादी यांना मोठा दिलासा
मिळाला आहे. न्यायालयात अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याने वेळेवर न्याय मिळण्यात अडचणी येतात. पण लोक न्यायालयाच्या माध्यमातून आपसी तडजोड करून काही प्रकरणे निकाली काढण्यात येत असतात. दरम्यान तालुका विधी सेवा समितीने 7914 जुन्या पेंडिंग प्रकरणांपैकी 958 प्रकरण तडजोड करण्यासाठी ठेवण्यात आली. यातील विविध 96 प्रकरणात आपसी तडजोड अंती एकूण 6 लाख 35 हजार 227 रक्कमेचे सेटलमेंट करण्यात आले. या आपसी तडजोडीमुळे वादी व प्रतिवादी यांचा पैसा, वेळ व त्रास वाचला असून त्यामुळे या सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणांची सुनावणी न्यायाधीश धनश्री भंडारी व सह दिवाणी न्यायाधीश व्ही.एस. कसबे यांनी केली आणि प्रकरणे मार्गी लावली. याप्रसंगी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. निनाद येरणे, अँड. सदानंद लांडे, अँड. मुरलीधर देवाळकर, अँड. अरुण धोटे, अँड. पिंपळकर, अँड. खोके, अँड. आस्वले, अँड. बियाबानी, अँड. चंद्रशेखर चांदेकर, अँड. कुरेशी, अँड. मंगेश बोबडे, अँड. टिपले यांचे सह वकील मंडळी व कार्यालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top