Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गुजरातची अट्टल वाहनचोर टोळी चंद्रपुर पोलिसांच्या ताब्यात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गुजरातची अट्टल वाहनचोर टोळी चंद्रपुर पोलिसांच्या ताब्यात १२ लाख ५० हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त बारा तासात गुन्हा उघडकीस डी.एस. ख्वाजा - आमचा...
गुजरातची अट्टल वाहनचोर टोळी चंद्रपुर पोलिसांच्या ताब्यात
१२ लाख ५० हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त
बारा तासात गुन्हा उघडकीस
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
दिनांक २० ऑगस्ट रोजी मनिविरसिंग जयपालसिंग दिल्लर, वय ४४ वर्ष, रा. शास्त्रीनगर, चंद्रपुर यांची ह्युंडाई सेंट्रो कंपनीची गाडी क्रमांक एमएच ०४ सी.ए. ४०९२ किमंत १,००,०००/- रूपयाची घरासमोरून चोरी गेली तसेच त्याच दिवशी फिर्यादी नामे पंकज दिवाकर मिश्रा, वय ३७ वर्ष, रा. ब्ल्यू पॅराडाईज हॉटेल, भवाजीभाई शाळे जवळ, चंद्रपुर मारूती सुझुकी कंपनीची वॅगनार गाडी क्रमांक एमएच १२ डीएस ७८४२ किमत ४,००,०००/- रू. ही ब्ल्यु पॅराडाईज हॉटेलचे बाजुचे पार्कींग मध्ये पार्किंगच्या ठिकाणावरून चोरी गेली. दोन्ही फिर्यादीनी वाहन चोरीची रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार अप क्रमांक ८६२, २०२२ कलम ३७९ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला.
दोन्ही गुन्हयांचे गांभीर्य बघता पो.स्टे. रामनगर ठाणेदार पो. नि. राजेश मुळे, गुन्हे शोध पथकातील सपोनि हर्षल एकरे, पोउपनि विनोद भुरले व डि.बी. असे गुन्हयांचे घटनास्थळी भेट देवुन, परिसरातील सी.सी.टि.व्ही फुटेज चेक करीत गुन्हयात वापरलेल्या गाडीचा पाठलाग करीत जुनोना रोड, बाबुपेठ येथे पोहचुन जुनोना रोडवरून गुन्हयात वापरलेली टाटा अट्रोस कंपनीची गाडी क्रमांक एम. एच. जी. जे. ०२ डी. एम. ०५५९ ही ताब्यात घेवुन गाडी मालकाचे नाव निष्पन्न करून आरोपी नामे सतनामसिंग प्रतापसिंग बावरी, वय ३२ वर्ष, रा. शेवला, ता. मेहकर, जि. बुलढाना यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयात चोरून नेलेल्या गाड्या हया बुद्धनगर, बाबूपेठ वार्ड येथुन त्याचे नातेवाईकाचे घराशेजारी ठेवलेल्या आहेत असे सांगितले वरून गुन्हयात चोरून नेलेल्या दोन्ही गाड्या जप्त केल्या. आरोपी सतनामसिंग प्रतापसिंग बावरी, वय – ३२ वर्ष, रा. शेदला, ता., मेहकर, जि. बुलढाना यास विश्वासात घेवुन विचारपुस केले असता त्यानी फरार आरोपी लखनसिंग त्रिपालसिंग सरदार, रा. पोसकोर दरवाजा वडनगर, ता. वडगनगर जि. मैसाना राज्य गुजरात हा गुजरात येथे दारूची तस्करी करण्याकरीता गाडी चोरून नेत असल्याची माहीती दिली. नमुद दोन्ही आरोपीतांवर महाराष्ट्रातील इतर जिल्हयात तसेच गुजरात राज्यात चोरी, घरफोडी तसेच अवैधरित्या दारू विक्रीचे गुन्हे नोंद आहेत. फरार आरोपी लखनसिंग त्रिपालसिंग सरदार रा. घोसकोर दरवाजा वडनगर, ता. बडगनगर जि. साना राज्य गुजरात याचा शोध घेणे सुरू आहे.
दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्यास पोलीस स्टेशन रामनगर येथील गुन्हे शोध पत्रकातील सपोनि हर्षल एकरे, पोउपनि विनोद भुरले तसेच गुन्हे शोध पथकातील सर्व कर्मचारी अतीशय परिश्रम घेवुन दोन्ही गुन्हे हे अवघ्या १२ तासात उघडकीस आणुन आरोपी व चोरीस गेलेल्या गाड्या जप्त केल्या आहेत.
ह्युंडाई सेंट्रो कंपनीची गाडी क्रमांक एमएच ०४ सी.ए. ४०९२ किमंत १,००,०००/- रूपये, मारुती सुझुकी कंपनीची वैगन आर, गाडी क्रमांक एमएच १२ डीएस ७८४२ किमंत ४,००,०००/- रूपये व गुन्हयात वापरलेली टाटा अट्रोस कंपनीची गाडी क्रमांक एम.एच.जी.जे. ०२. डी.एम. ०५५९ किमंत ७,५०,०००/- रूपये असे एकुण १२,५०,०००/-रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस निरीक्षक राजेश मुळे, सपोनि हर्षल एकरे, पोउपनि विनोद भुरले, रजनीकांत पुलावार, पेतरस सिडाम, अशोक मरसकोल्हे, प्रशांत शेंदरे, विनोद यादव, किशोर वैरागडे, पुरुषोत्तम चिकाटे, आनंद खरात, निलेश मुडे, पांडुरंग वाघमोडे, सतिश अवथरे, लालु यादव, विकास जुमनाके, हिरालाल गुप्ता, संदिप कामडी, सुजीत शेंडे, विकास जाधव, भावना रामटेके, तसेच सायबर सेल, चंद्रपुर येथील प्रशांत लारोकर, छगन जांभुळे, अमोल सावे यांनी केलेली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top