Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कामगारांच्या अस्तित्वाच्या लढाईत महिलांचा मोठा सहभाग आवश्यक - प्रा. प्रज्वला टट्टे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कामगारांच्या अस्तित्वाच्या लढाईत महिलांचा मोठा सहभाग आवश्यक - प्रा. प्रज्वला टट्टे 1 मे कामगार दिना निमित्त सास्ती टाऊनशिप येथे रॅली व जाहिर...

  • कामगारांच्या अस्तित्वाच्या लढाईत महिलांचा मोठा सहभाग आवश्यक - प्रा. प्रज्वला टट्टे
  • 1 मे कामगार दिना निमित्त सास्ती टाऊनशिप येथे रॅली व जाहिर सभा
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
राजुरा -
संपूर्ण जगात कामगारांनी मोठा संघर्ष करून आपल्याला देशात सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून कामगारांच्या हिताचे अनेक कायदे तयार करण्यात यश मिळविले. या कायद्यांना तिलांजली देऊन कामगारांच्या लुटीचा मार्ग उद्योगपती आणि संपूर्ण औद्योगिक क्षेत्राच्या हातात देण्याचे षडयंत्र देशात सुरू आहे. आता आपण शांत व विरोध न नोंदवित बघ्याची भूमिका घेतली तर भावी पिढीसाठी ही सर्वात मोठी दुर्दैवी घटना असेल, म्हणुन या कामगारांच्या सोबतीला महिलांना आपल्या हक्कासाठी योगदान देत संघर्षासाठी सिद्ध व्हावे, असे आवाहन नागपुर येथील शेतकरी आंदोलनाच्या अभ्यासक प्रा. प्रज्वला टट्टे यांनी केले. राजुरा तालुक्यातील सास्ती टाऊनशिप या कोळसा खाण वसाहतीत आयोजित 1 मे आंतर राष्ट्रीय कामगार दिन समारोहात प्रमुख अतीथी म्हणुन बोलत होत्या.
कोरोना काळात दोन वर्षाच्या कालावधी नंतर यावर्षी मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम सास्ती टाऊनशिप परिसरात सायंकाळी भव्य रॅली काढण्यात आली. रॅली नंतर सभेची सुरुवात झाली. जाहिर सभेच्या अध्यक्षस्थानी संयुक्त खदान मजदुर संघाचे केंद्रीय अध्यक्ष नंदकिशोर म्हस्के होते. प्रमुख अतिथी जिजावू, सावित्री, रमाई मंचाच्या डॉ. अभिलाषा गावतुरे, कामगार नेते जी.जे.जोसेफ उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलतांना डॉ. अभिलाषा गावतुरे म्हणाल्या की, सद्या सर्वत्र आपल्या ज्वलंत आणि महत्वाच्या प्रश्नाकडे राज्यकर्ते हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असून फारसे महत्व नसलेल्या मूद्द्यावर अधिक राळ उठविली जात आहे. अशावेळी सर्व समविचारी विचारधारेच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने होत असलेल्या या अन्याया विरोधात जोरदार आवाज उठवून सामूहिक संघर्ष करण्याची गरज आहे. त्यामुळे कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या या कामगार विरोधी कृतीचा प्रत्येक ठिकाणी विरोध झाला पाहिजे. कामगार नेते जी.जे. जोसेफ यांनी सरकारच्या कामगार विरोधी मानसिकतेचा जोरदार विरोध करीत आता संघर्ष केल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरुषोत्तम मोहुरले, संचालन दिलीप कनकुलवार व आभार प्रदर्शन दिनेश जावरे यांनी केले. या कार्यक्रमात ग्राम प्रगती युवा मंच यांनी सुंदर गीत सादर केले. रॅली मध्ये मोठ्या संख्येने कामगार व महिला सहभागी झाल्या. या कार्यक्रमात सर्व उपस्थितांना लाल दुपट्टा देऊन स्वागत करण्यात आले. त्यामुळे कार्यक्रमात सर्वत्र "लाल लाल लाहरायेंगे, आगे बढते जायेंगे " चा गजर होत होता.
कार्यक्रमाला श्रीपुरम रामल, बिंदुसार गजभिये,
कार्यक्रमाला समितीचे अध्यक्ष तुळशिराम भोजेकर, लक्ष्मण घुगुल, रायलिंगू झुपाका, मधुकर ठाकरे, श्रीपूरम रामलू, भद्रय्या नातरगी, पि.बी.पाटील, शालिक सोनटक्के, किशोर निब्रड, गुलाब टेंभूर्णे, सातुर तिरूपती, विलास बारसागडे, गणेश पावडे, नरसिंग भुपेली, निरंजन देवगडे, समाधान लडके, भाऊराव लांडे, घनश्याम कावळे, सोपर संपत, दिनेश पारखी, विलास कोडापे, सुनिल रामदेनी, दिलीप डेरकर, केशव सातपुते, ज्ञानेश्वर मुरकुटे, ए.डी. नागदेवते, आनंंद झाडे, रमेश अंगुरी, राजु काटम, पंकज झाडे, रेखा भांडारकर, शालु झाडे, रेखा कुत्तरमारे, एच.ईश्वर, डि.बी. महाकालकर, साईनाथ ढवस, विलास भोयर, विनोद डेरकर, गंगाधर बोबडे, हरीहर हटवार, उल्हास खुणे, रविन्द्र डाहुले, शेख सलीम, शंकर मुत्यालू, राय नरसु, बिंदुसार गजभिये यांचेसह संयुक्त खदान मजदुर संघ, कोल वाशरी कामगार संघटना, ठेकेदारी मजदुर युनियन, प्रगती महिला मंडळ, किसान मजदुर संघटना, ग्राम प्रगती युवा मंच, गडचांदूर यांचेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते रॅली व सभेत सहभागी झाले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top