Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बामनवाडा येथे SP विधी महाविद्यालयातील ज्युडीशनल मॅजीस्ट्रेट प्रथम वर्ग परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थीनींचा होणार सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सर्वोदय शिक्षण मंडळाचा स्तुत्य उपक्रम बामनवाडा येथे SP विधी महाविद्यालयातील ज्युडीशनल मॅजीस्ट्रेट प्रथम वर्ग परिक्षेत उत्तीर्ण  विद्यार्थीनी...

  • सर्वोदय शिक्षण मंडळाचा स्तुत्य उपक्रम
  • बामनवाडा येथे SP विधी महाविद्यालयातील ज्युडीशनल मॅजीस्ट्रेट प्रथम वर्ग परिक्षेत उत्तीर्ण 
  • विद्यार्थीनींचा होणार सत्कार  
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील ज्युडीशनल मॅजीस्ट्रेट प्रथम वर्ग परिषेत उत्तीर्ण बामनवाडा येथील विद्यार्थीनी ललीता ताराचंद टाकभौवरे-करमनकर व चंद्रपूर येथील निकीशा अशरफ खाँ पठाण यांचा सत्कार मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधिश तथा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण खंडपिठ नागपूर चे न्यायीक सदस्य मुर्लीधरराव गिरडकर यांच्या हस्ते शनिवार दि. ३० एप्रिल ला सायं. ६ वाजता बामनवाडा येथील लुंबीनी बुद्धविहाराच्या प्रांगणात आयोजित सत्कार समारंभात करण्यात येणार आहे. 
सत्कार समारंभाचे अध्यक्ष म्हणून सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूरच्या अध्यक्षा श्रीमती सुधा शांताराम पोटदुखे, प्रमुख अतिथी म्हणून राजुरा चे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, तहसिलदार हरीष गाडे, संवर्ग विकास अधिकारी किरणकुमार बनवाडे, प्रमुख उपस्थितीत सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर चे उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव तथा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दिक्षित, संस्थेचे सदस्य राकेश पटेल, सौ. सगुना तलांडी, चुनाळा चे सरपंच बाळनाथ वडस्कर, बामनवाडा चे सरपंच सौ. भारती पाल, उपसरपंच अविनाश टेकाम उपस्थित राहणार आहे.
शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील विद्यार्थी नेहमीच मानाचा तुरा रोवित असतात. त्यांच्या पुढील वाटचालीकरीता प्रेरणा मिळावी याकरीता सर्वोदय शिक्षण मंडळाच्या वतीने अशा सत्कार समारंभाचे आयोजन करीत विद्यार्थ्यांना स्फुर्ती देत असते. राजुरा तालुक्यातील बामनवाडा सारख्या लहानशा गावातील विद्यार्थीनी ललीता ताराचंद टाकभौवरे-करमनकर व चंद्रपूर येथील निकीशा अशरफ खाँ पठाण यांनी ज्युडीशनल मॅजीस्ट्रेट प्रथम वर्ग परिषेत प्राविण्य प्राप्त करीत महाविद्यालयाचे नांव उंचाविल्यामुळे त्यांच्या सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. सत्कार सोहळ्यानंतर निळी पहाट गृप चंद्रपूर प्रस्तुत बुद्ध भिमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सर्वोदय शिक्षण मंडळ व त्याअंतर्गत आस्थापनेतील सर्व महाविध्यालय, विध्यालय तथा बामनवाडा येथील मिलींद संजोग मंडळाचे अध्यक्ष आक्रोश जुलमे, रमाबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. मायाबाई वाघमारे व ग्रमवसियानी केले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top