Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वेकोलि व्यवथापनाने मान्य केल्या पंढरी घटे यांच्या मागण्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वेकोलि व्यवथापनाने मान्य केल्या पंढरी घटे यांच्या मागण्या सात दिवसानंतर पंढरी घटे यांचे उपोषण मागे आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - र...

  • वेकोलि व्यवथापनाने मान्य केल्या पंढरी घटे यांच्या मागण्या
  • सात दिवसानंतर पंढरी घटे यांचे उपोषण मागे
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा तालुक्यातील साखरी वाघोबा येथील शेतजमीन वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या पोवनी ओपनकास्ट कोळसा खाणीतील प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष पंढरी घटे यांनी वेकोलि अधिकाऱ्यांच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी मागील सात दिवसांपासून उपोषण सुरू होते. मंगळवारी मुख्य महाप्रबंधक सव्यसाची डे यांनी आपल्या कार्यालयात बैठक घेतली आणि मागण्या मंजूर करीत असल्याचे लेखी पत्र दिले. यानंतर स्वतः सीजीएम यांनी उपोषण मंडपात आले आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी पंढरी घटे यांना लिंबू पाणी देऊन उपोषण सोडविले. यावेळी उपक्षेत्रीय प्रबंधक एकंबरम, नियोजन अधिकारी चक्रवर्ती, शेतकरी संघटनेचे नेते शेषराव बोंडे, बळीराम खुजे, मारोती उरकुडे, सचिन गोरे, श्यामराव काटवले, लक्ष्मण आस्वले, मारोती दातारकर, नामदेव भोंगळे, छाया घटे, कौशल्या करमनकर, शोभा कावळे, कौशल्या घटे, तृप्ती खनके, सुरेखा कोरडे, संगीता बेसूरवार, सिंधु पांडे यांच्यासह मोठ्या संख्येने अन्यायग्रस्त शेतकरी उपस्थित होते. गेल्या सात दिवसांपासून प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या विविध समस्या साठी पंढरी घटे यांनी बेमुदत उपोषण पुकारले होते. यावेळी शेकडो लोकांनी, राजकिय नेत्यांनी भेटी देत उपोषणाला पाठिंबा घोषित केला. पंढरी घटे यांच्या उपोषणाला चांगला पाठिंबा मिळाला. मुख्य महाव्यवस्थापक सव्यसाची डे यांनी बोलविलेल्या बैठकीला शेतकरी नेते शेषराव बोंडे, बळीराम खुजे यांनी मागण्या विषयी सविस्तर मांडणी केली. चर्चेअंती मागण्यांप्रमाणे लेखी उत्तर देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यानंतर मुख्य महाप्रबंधक यांचे हस्ते निंबुपाणी घेऊन पंढरी घटे यांनी उपोषण सोडले. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top