Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: भद्रावती तालुक्याची क्षयरोग मुक्ती कडे वाटचाल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भद्रावती तालुक्याची क्षयरोग मुक्ती कडे वाटचाल सौ. मनीषा शर्मा - आमचा विदर्भ प्रतिनिधी भद्रावती - वाचवा ज्योत जीवनाची, निर्मूलनासाठी करा तपास...

  • भद्रावती तालुक्याची क्षयरोग मुक्ती कडे वाटचाल
सौ. मनीषा शर्मा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
भद्रावती -
वाचवा ज्योत जीवनाची, निर्मूलनासाठी करा तपासणी क्षयरोगाची.
टिबी हारेगा, देश जीतेगा. 
वरील ब्रिद वाक्यासह दिनांक 1 ऑकटोबर 2021 ते 24 मार्च 2022 दरम्यान शासन उदिष्टित टीबी फ्री ब्लॉक आणि एसीएसएम ॲक्टिव्हिटीज अंतर्गत तसेच 24 मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रोहन नेहमाय तालुका वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक आणि कु. नम्रता ढोरे टीबीएचव्ही, टीबी युनिट, आरोग्य सेवा, भद्रावती यांच्या पर्यवेक्षनामध्ये भद्रावती मधील श.प्रा.आ. केंद्र भद्रावती, प्रा.आ. केंद्रे माजरी, चंदनखेडा, मुधोली, डोंगरगाव, घोडपेठ अंतर्गत येणारे वॉर्ड व उपकेंद्रे या संपूर्ण ठिकाणी सामान्य लोक, समुदाय, इतर भाग धारक, इ. मध्ये विविध ॲक्टिव्हिटीज करुन राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत संपूर्ण भद्रावती तालुक्यातील जनसमुदायामध्ये क्षयरोगाबाबत जनजागरण करण्यात आले. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिजामाता नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी विविध ठिकाणी क्षयरोगाबाबत स्ट्रीट प्ले सादर केला कार्यक्रमास सौ. नंदेश्वर शिक्षिका, सौ. ठाकरे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, कु. थुल प्रयोगशाळा सहाय्यक, भडके आयसीटीसी सल्लागार, मडावी आरोग्य सहाय्यक, कु. रोडे अधिपरीचारिका, सौ. सूर्यवंशी माहिती प्रविष्ट संचालक, इ. मान्यवर उपस्थित होते. 
भद्रावती तालुक्यात जानेवारी 2019 ते डिसेंबर 2020 मध्ये एकूण 292 क्षयरुग्ण निघाले व त्यांना उपचार सुरु केला तर रोहन नेहमाय तालुका वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक आणि कु. नम्रता ढोरे टीबीएचव्ही ह्यांच्या अथक प्रयत्नांनी आणि आशा स्वयंसेवक, आरोग्य कर्मचारी ह्यांच्या साहाय्याने क्षय रुग्णांना योग्य उपचारावर आणून व तसेच त्यांचा पाठपुरावा करुन जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 मध्ये एकूण 125 क्षयरुग्ण निघाले व त्यांना उपचार सुरु केला आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top