Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कार्याची पावती म्हणजे हा उत्कृष्ठ सभापती पुरस्कार - ब्रिजभूषण पाझारे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कार्याची पावती म्हणजे हा उत्कृष्ठ सभापती पुरस्कार - ब्रिजभूषण पाझारे  पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान शशी ठक्कर -...

  • कार्याची पावती म्हणजे हा उत्कृष्ठ सभापती पुरस्कार - ब्रिजभूषण पाझारे 
  • पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
सामाजिक व राजकीय जीवनात वावरतांना, अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.तर अनेकांच्या अडचणी सोडवाव्या लागतात.यात नेहमी यश मिळेलच असे होत नाही. बरेच वेळा लोकांची नाराजी सहन करावी लागते. यातच पद असेल तर टीका टिपणी आलीच. त्याची पर्वा मन करता निःस्वार्थ सेवा केली की यश मिळते. उत्कृष्ट सभापती पुरस्कार निःस्वार्थ सेवा व कार्याची पावती आहे.असे प्रतिपादन उत्कृष्ट सभापती पुरस्कार प्राप्त जिप सदस्य, भाजपा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यांनी केले. ते दि. 07 मार्च 22ला पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट जि.प सदस्य व सभापती, पंचायत समिती सदस्य व सभापती पुरस्कार समारंभात सत्काराला उत्तर देताना बोलत होते.
यावेळी पंचायतराज मंत्री कपिल पाटील,जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे-पाटील,सरचिटणीस सुभाष घरत, प्रतापराव पाटील,प्रमोद काकडे, रेखा कंटे, शरद बुट्टे पाटील,अमृता पवार,सरिता गाखरे, सुभाष पवार,निलम पाटील,उदय बने, जय मंगल जाधव,भारत शिदे, अवंतिका लेकुरपालके,शिवाजी मोरे यांची मंचावर उपस्थिती होती.
पाझारे म्हणाले,चंद्रपूर जिल्हातील नकोडा या छोट्याछा गावातून राजकीय प्रवासाची सुरवात झाली. चंद्रपुर जि.प समाजकल्याण सभापती पदावर राहून विविध योजना आखून जिल्हातील नागरिकांनां लाभ मिळवून दिला. पद हे मिरविण्यासाठी नसते तर ती जवाबदारी आहे.आ.मुनगंटीवार यांच्या या प्रेरणादायी वाक्यामुळे काम करीत गेलो व पुरस्काराचा मानकरी ठरलो असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील उत्कृष्ट सभापती हा पुरस्कार जनतेच्या प्रेमामुळेच मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top