आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथक व इतिहास विभाग व भारतीय शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पराक्रम दिवसाचे औचित्य साधून "नेताजी सुभाषचंद्र बोस भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील चॅम्पियन" या विषयावर राष्ट्रीय वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते, स्वातंत्र्य लढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान, नेताजींचे कार्य, नेताजींच्या इतिहासाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस: भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील चॅम्पियन या विषयावर आभासी राष्ट्रीय वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते, या व्याख्यानास प्रमुख वक्ते म्हणून आसनसोल गर्ल्स कॉलेज आसनसोल पश्चिम बंगाल येथील इतिहास विभागातील सहाय्यक प्राध्यापक बिस्वजित दास ऑनलाइन उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
प्रा. बिस्वजित दास यांनी आपल्या व्याख्यानात सुभाषचंद्र बोसांच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. सुभाषबाबूनी युवकांना संघटीत करून या स्वातंत्र्याच्या पवित्र्य कार्यात युवकांनी हातभार लावावा असे आवाहन करत नेताजींनी पराभूत सैनिकांमधून आझाद हिंद सेनेचे संघटन करून भारतीय स्वातंत्र्यलढ्याला एक नवा आयाम दिला, इंग्रजांचे शत्रू ते आपले मित्र या न्यायाने दुसरे महायुद्ध सुरू असतांना इंग्रजांच्या शत्रूंची सोबत घेऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला, मात्र मित्र राष्ट्रांचा पराभव होताच आझाद हिंद सेनेला शस्त्र खाली ठेवावे लागले व भारताला स्वातंत्र्य मिळायला उशीर झाला, असे यावेळी प्रतिपादन केले.
या आभासी व्याख्यानास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम.वारकड, प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ श्याम खंडारे, सोबतच इतिहास विभाग प्रमुख तथा रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.गुरुदास बलकी, भारतीय शिक्षण मंडळ च्या रेखा देशपांडे तसेच संपूर्ण भारतातून इतिहास प्रेमी प्राध्यापक व विद्यार्थी, रासेयो कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक या राष्ट्रीय वेबिनार ला ऑनलाइन उपस्थित होते. हा वेबिनार गुगल मिट वर आयोजित करून युट्यूबवर थेट प्रक्षेपण करण्यात आले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेविका प्रतीक्षा वासनिक तर आभार सुरज पचारे यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.