बल्लारपुर -
बल्लारपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारी कारवाया दरम्यान बल्लारपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलीस कर्मचारी दयानंद उपासे यांच्या तक्रारीवरून एक चेन, एक हार, एक मंगळसूत्र आणि दोन राणी हार असे नऊ तोळे सोन्याचे दागिन्यांसह सात महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यात अनीता दादाजी लोंढे वय 47, नयना एकनाथ मानकर वय 21, रीमा जोगेंद्र मानकर वय 32, नम्रता चैतराम उखाड़े वय 25, प्रिया प्रदीप हातगड़े वय 28, छाया रान्नू मानकर वय 45, सोनी सोहन उखाड़े वय 30 सर्व नागपूर अजनी पोलीस ठाण्याच्या आवारातील रामेश्वरी येथील रहिवासी आहेत, या महिला वर्धा, हिंगणघाट, नागपूर, चंद्रपूर इत्यादी शहरांमध्ये लहान मुलांच्या मदतीने बसमध्ये चढणाऱ्या महिलांना बळी बनवतात.
1 नोव्हेंबर रोजी दयानंद उपासे दाम्पत्य चंद्रपूरहून लातूरला जाण्यासाठी आसिफाबाद बसमध्ये बसले होते, मोबाईलमध्ये व्यस्त असल्याने एक महिला महिलेच्या बाजूला बसली आणि दागिन्यांवर हात साफ करून बल्लारपूर बसस्थानकाजवळ खाली उतरली. राजुरा येथे पोहोचल्यावर उपासे दाम्पत्याला दागिन्यांची बॅग गायब असल्याचे समजले, तेथून त्यांनी पुन्हा बल्लारपूर पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. बल्लारपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमीज मुलाणी हे त्यांच्या पथकासह कारवाईत गुंतले असता ७ नोव्हेंबर रोजी सदर महिला चंद्रपुरात असल्याची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेऊन कडक चौकशी केल्यानंतर पोलिसांना इतर सर्व महिला साथीदारांची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ नागपुरात पोहोचत अजनीच्या रामेश्वरी संकुलातील अन्य महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नऊ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चार लाख पन्नास हजारांचा माल जप्त करून कारवाई केली. त्या महिलांना 7 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर पर्यंतचा पीसीआर प्राप्त झाला आहे, पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमीज मुलाणी व त्यांचे पोलीस पथक करीत आहेत, या मोठ्या कारवाईत माथनकर, संध्या, सीमा, संतोष दांडेवार, श्रीनिवास बाबिटकर, कुमरे मेजर इत्यादी पोलिस व महिला पोलिसांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.