Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: डिजिटल मीडियाच्या पत्रकारांकरिता वृत्त स्पर्धा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
डिजिटल मीडिया असोसिएशन चंद्रपूरचा पुढाकाराने डिजिटल मीडियाच्या पत्रकारांकरिता वृत्त स्पर्धा पत्रकार दिनाच्या औचित्याने 9 जानेवारी 22 ला स्पर...


डिजिटल मीडिया असोसिएशन चंद्रपूरचा पुढाकाराने
डिजिटल मीडियाच्या पत्रकारांकरिता वृत्त स्पर्धा
पत्रकार दिनाच्या औचित्याने 9 जानेवारी 22 ला स्पर्धेचे आयोजन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
दरवर्षी 6 जानेवारी ला महाराष्ट्रात "पत्रकार दिन" साजरा केला जातो. यावर्षी 6 जानेवारी 2022 पत्रकार दिनाच्या औचित्याने रविवार दिनांक 9 जानेवारी रोजी डिजिटल मीडिया असोसिएशनच्या (DMA) माध्यमातून न्यूज पोर्टल व यूट्यूब चैनल साठी एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेमध्ये विजेता होणाऱ्यांना प्रथम व द्वितीय व प्रोत्साहन स्तराचे पुरस्कार देण्यात येणार आहे. ही स्पर्धा चंद्रपुर जिल्ह्यातील न्यूज पोर्टल व यूट्यूब चैनल यांच्यासाठी आयोजित करण्यात आली असून रविवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी डिजिटल मीडिया असोसिएशन (DMA) चा चंद्रपुर येथील  कार्यालयात घेण्यात आलेल्या सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील पूर्ण  न्यूज पोर्टल व यूट्यूब चैनल यांना या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्यांना खालील विषयांवर लिखाण करावयाचे आहे. 
  • चंद्रपूर जिल्ह्यामधील मूळ समस्यांवर आपले वृत्त
  • यशोगाथा व व्यक्तिविशेष  
  • वन्यप्राण्यांचे हल्ले, समस्या व समाधान 
या तीन विषयांवर प्रकाशित वृत्त स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. सोमवार दिनांक 22 नोव्हेंबर 2021 पासून ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत या दिवसांमध्ये प्रकाशित होणाऱ्या वृत्तांनाच प्राधान्य दिले जाईल. तीन वेगवेगळ्या विषयांवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून वरील विषयावर वृत्त प्रकाशित करणाऱ्या प्रथम व द्वितीय पारितोषिक विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल,श्रीफळ व रोख रक्कम देऊन पुरस्कृत करण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची निवड करण्यासाठी एक परीक्षक मंडळ नेमण्यात येणार असून परीक्षक मंडळाचे निर्णय हा अंतिम राहणार आहे. डिजिटल मीडियाशी संबंधित प्रत्येकांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 
सद्य परिस्थितीत डिजिटल मीडियाचा फार जास्त प्रमाणात वापरला जात आहे. डिजिटल मीडिया ला मान्यता मिळावी यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्नही करण्यात येत आहे. स्पर्धेच्या युगात आपण सर्वश्रेष्ठ व उत्कृष्ट राहावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन डिजिटल मिडिया असोसिएशन चंद्रपुर यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. डिजिटल मीडियाशी संबंधित जास्तीत जास्त न्यूज पोर्टल धारक व यूट्यूब चैनलशी जुळलेल्यानी या स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top