राजुरा -
वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी उपक्षेत्रातील डारसल इंफ्रास्ट्रक्चर कंपनी कडून त्यांच्या चालकांकडून बेकायदेशीर प्रतिज्ञापत्रावर जबरदस्तीने स्वाक्षरी करवून घेतली जात होती. स्वाक्षरी न केल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देण्यात येत होती. मात्र भाजपा कामगार मोर्चाच्या आक्रमक भूमिकेमुळे या प्रकाराला आळा बसला आहे. चालकांनी बेकायदेशीर प्रतिज्ञापत्र फाडून राज्य सरचिटणीस अजय दुबे यांच्याकडे तक्रार केली.
सदर बाब अजय दुबे यांनी वेकोलि महाप्रबंधक सव्यसाची डे यांच्या निदर्शनास आणून दिली व असले प्रकार त्वरित थांबवण्याची विनंती केली, अन्यथा गंभीर परिणामांचा इशारा देत कामगारांचे शोषण केले गेले नाही काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला. वेकोलि महाप्रबंधक सव्यसाची डे यांनीही दखल देत तात्काळ कठोर कारवाईचे आश्वासन दिले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.