- बल्लारपूर शिवसेने तर्फे योग्य मोबदला मिळणेबाबत वन विभागास निवेदन
बल्लारपूर -
मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस बिकट स्थिती धारण करत असून वेगवेगळ्या कारणांमुळे वन्यप्राण्यांच्या मृत्यूचा आकडा वाढत असताना दुसरीकडे त्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांची संख्याही विस्तारत असल्याचे पुढे आले आहे. वन्य जीवांचे मृत्यू अथवा त्यांच्यावर होणारे हल्ले अनसर्गिक असले तरी त्यामागची करणे नैसर्गिक आहेत, कारण मानव आणि वन्यजीव दोघांकरिता हा संघर्ष जगण्याचा आहे, जिंकण्याचा नाही.
वन्यप्राणांच्या हल्यात एकीकडे मानव जीवित हानी होत असून मानव व वन्य जीव संघर्ष बाबत उपाय योजना करून योग्य मोबादला देण्याबाबतचे निवेदन बल्लारपूर शिवसेनेकडून वन विभागाला देण्यात आले.
वन्य प्राणी राष्ट्रीय संपत्ती असल्याने त्यांचे संरक्षण करणे शासन व नागरिकांचे कर्तव्य आहे. शहरातील पं. दीनदयाल वार्ड हे जंगला लगत असल्यामुळे मागील काही दिवसांपासून परिसरात मानव व वन्य प्राण्यांच्या संघर्ष सतत निर्माण होत आहे. या संघर्षात वाघाने स्थानिकांच्या बकरी तसेच दुघारू गायी यांचे भक्षण केल्याने सर्वसामान्यांचे नागरिकांचे नुकसान झाल्याने रोष व भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्याचे प्रमाण बघता बल्लारपुर शिवसेना उपजिल्हा प्रमुख व नगरसेवक सिक्की यादव, तालुका प्रमुख प्रकाश पाठक, शहर प्रमुख बाबा शाहू यांच्या उपस्थितीत नगरसेविका सौ. रंजीताताई बीरे यांच्या नेतृत्वाखाली वन परिक्षेत्र अधिकारी यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याची मागणी व वन्यप्राण्यांच्या बंदोबस्त करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. मागणी पूर्ण न झाल्यास शिवसेना तर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. या प्रसंगी प्रामुख्याने शिवसेना उपजिल्हा प्रमुख व नगरसेवक सिक्की यादव, तालुका प्रमुख प्रकाश पाठक, शहर प्रमुख बाबा शाहू, अनुदान योजना समिती सदस्य शेख युसूफ, बॉबी कादासी व इतर शिवसैनिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.