- कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर आणि विविध शासकीय योजनांची माहितीबाबत मार्गदर्शन
- स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथील सातत्याने चालणाऱ्या श्रमदानाची व विकास कामाची मान्यवरांनी केली पाहणी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील मंगी (बु) येथे तालुका विधी सेवा समिती राजुरा आणि पंचायत समिती राजुरा तथा ग्राम पंचायत मंगी (बु) यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 16 ऑक्टोंबर ला 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत कायदे विषयक मार्गदर्शन आणि विविध शासकीय योजनांची माहितीबाबत मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. सर्व प्रथम महात्मा गांधी आणि परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पुजन करुन पुष्पमाला अर्पण करण्यात आली. त्यानंतर सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छाने स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजुरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ तर कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणुन राजुरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विजय परचाके, विस्तार अधिकारी (पंचायत) रविंद्र रत्नपारखी तथा पेसा कायदयाचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर आत्राम हे होते. तसेच ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडासाम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंबादास जाधव, उपाध्यक्ष सुमनाताई येमुलवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मोहपतराव कुळमेथे, पेसा समितीचे अध्यक्ष संगीताताई कोडापे (मंगी बु), जीवनाबाई कोटनाके (मंगी खु), पोलिस पाटील व्यंकटराव मुंडे, माजी जिप सदस्य भिमरावजी पुसाम, माजी सरपंच रसिकाताई पेंदोर, माजी सरपंच सोनबती मडावी, माजी उपसरपंच वासुदेवजी चापले, आदिवासी समाज पाटील सोमाजी कोडापे, ज्येष्ठ नागरिक संभाजी पा. लांडे, मोतीराम पा. पेंदोर, सखरामजी चनकापुरे, विश्वेश्वर मरस्कोल्हे तसेच ग्राम पंचायतीचे सचिव गजानन वंजारे, मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे, कृषी मित्र शंकर तोडासे, रविंद्र सातपुते इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडासाम यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कृषीमित्र शंकर तोडासे यांनी मानले.
कार्यक्रमात कायदे विषयक मार्गदर्शन, पेसा कायदयाची माहिती व विविध शासकीय योजनांची माहिती मान्यवरांनी दिली. या कार्यक्रमानंतर मान्यवरांनी मंगी (बु) स्मार्ट गावाची पाहाणी केली. गावातील सुंदर रस्ते, स्वच्छता, शौषखडडे, वृक्षसंवर्धन, मनमोहक बगीचा या वातावरणांनी भारावून गेले. शहराला लाजवेल असे कार्य ग्रामवासीनी केलेले आहे तसेच गावानी स्वच्छतेचा ध्यास घेवून गाव सुंदर तयार केलेला आहे यात गावाचं श्रम आहे असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमामुळे गावात एक आनंददायी सोहळयाचे रुप आले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंदराव मडपती, बालाजी गेडाम, गणपत कोडापे, शरद पुसाम, मंगेश कोडापे, रमेश कोडापे, सुरेश येमुलवार, वसंता सोयाम तसेच अंगणवाडी सेविका शारदाताई क्षिरसागर, भिमबाई कन्नाके, सरस्वतीताई आडे, सुरेखाताई तोडासे, शिक्षणप्रेमी शैलाताई जयपाल मडावी तसेच ग्राम पंचायत कर्मचारी नितीन मरसस्कोल्हे, चरणदास चिलकुलवार, दिनेश राठोड, बालाजी मुंडे तथा गावातील युवक मंडळ आणि अनुसयाबाई कुळसंगे व फुलाबाई सिडाम यांनी मोलाचे सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.