- राजुरा पंचायत समिती गट साधन केंद्राचा पुढाकार
चंद्रपूर -
दिनांक 11 ऑक्टॉबरला जागतिक बालिका दिन व पंसचे गटशिक्षणाधिकारी विजय परचाके यांच्या अवतरण दिवसाचे औचित्य साधून कोविड काळात गाव पातळीवर स्वयंप्रेरणेने विद्यार्थ्यांना अध्यापनात सहकार्य करणाऱ्या तालुक्यातील विशाल मनोहर शेंडे वरूर रोड, कु. शैला जयपाल मडावी मंगी बु., सौ. मंगला शालीक दुबे श्रीरामपुर, सतीश वारलु कुळमेथे, सौ. कुंदा योगेश्वर भलवे कोहपरा, कु.अभिलाषा मेघशाम बोबडे, अक्षय किसन टेकाम हरदोना खुर्द, तिलक परशुराम पाटील नोकारी बु, कु. नाजूका लटारू जगताप साखरवाही आणि कु. प्रियंका विठ्ठल ठमके धानोरा या शिक्षण प्रेमी व स्वयंसेवकांचा प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मार्गदर्शन करतांना केवलराम डांगे व विजय परचाके यांनी मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला फुले दाम्पत्यांचा वारसा पुढे चालवावा लागेल असे आवाहन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी विद्यालयचे मुख्याध्यापक केवलराम डांगे, केवलराम डांगे, श्रीराम मेश्राम, संजय हेडाऊ, मनोज गौरकार इत्यादी विस्तार अधिकारी शिक्षण, वासुदेव चापले, ग्रामसेवक वंजारी, रत्नाकर भेंडे व इतर शिक्षकांची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.