Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरा येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेना व काँग्रेसची रॅली व्यापाऱ्यांत नाराजीचा सूर  आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स  राजुरा - महा विकास आघाडीचे घटक...
  • केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेना व काँग्रेसची रॅली
  • व्यापाऱ्यांत नाराजीचा सूर 
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स 
राजुरा -
महा विकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी येथील शेतकर्‍यां वरील अत्याचाराचे विरोधात पुकारलेल्या आजच्या महाराष्ट्र बंद ला राजुरा शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळ पासुन अनेक दुकाने बंद होती, मात्र काही दुकानदारांनी आपली दुकाने नेहमीप्रमाणे सुरू केली. यानंतर सकाळी शिवसैनिक व काँग्रेस कार्यकर्ते रॅली द्वारे आल्या नंतर त्यांच्या विनंती वरुन दुकाने बंद झाली. यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी शहरात फिरून दुकाने बंद करविली. या दोन्ही पक्षांनी एकत्र न येता स्वतंत्रपणे फिरून बंद यशस्वी करण्याचा प्रयत्न केला.
शिवसेनेचे राजुरा तालुका विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात भवानी दुर्गा उत्सव मंडळ नाका नंबर ३ येथे जमत शेतकरी विरोधी सरकारचा निषेध करून घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर शिवसेने ने सकाळी अकरा वाजता बाईक रॅली काढली. शिवसेनेचे कार्यकर्ते राजुरा शहरात फिरले, त्यांनी रस्त्यावरील अनेक दुकाने बंद करविली. या आंदोलनात शिवसेना नेते बबन उरकुडे, शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, शिवसेना शहर प्रमुख निलेश गंपावार, शिवसेना तालुका समन्वयक वासुदेव चापले, तालुका प्रमुख युवासेना बंटी मालेकर, माजी शहर प्रमुख भुमन सल्लम, माजी संघटक नरसिंग मादर, सास्तीचे सरपंच रमेश पेटकर, युवासेना पदाधिकारी कुणाल कुडे, स्वप्नील मोहुर्ले आणि तालुक्यातील प्रत्येक गावचे शिवसेना शाखाप्रमुख, युवासेना शाखाप्रमुख यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सकाळी संविधान चौकात एकत्र आले आणि तेथे केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यावेळी बोलतांना नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शेतकरी वर्गाच्या विरोधातील धोरणांवर आणि शेतकर्‍यांवरील दडपशाहीच्या कृत्याचा जोरदार विरोध करीत निषेध नोंदविला. या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, महिला तालुकाध्यक्षा कविता उपरे, सं. गां. नि. यो. अध्यक्ष साईनाथ बतकमावार, जि प सदस्य मेघाताई नलगे, अविनाश जेणेकर, नगरसेवक हरजीत सिंग संधू, गजानन भटारकर, नगरसेविका गीता रोहणे, दिपा करमनकर, साधना भाके, अर्चना गर्गेलवार, शुभांगी खामनकर, संगीता मोहुर्ले, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, शहराध्यक्षा संध्या चांदेकर,  माजी नगरसेवक प्रभाकर येरने, राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक राव, राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मेहमूद मुसा, राकाचे संतोष देरकर, रकिब शेख, आसिफ सय्यद, उमेश गोरे, विनोद झाडे, मारोती बोढेकर, प्रणय लांडे, आकाश मावलीकर, शाहनवाज कुरेशी, सुजित कावळे, रजुभाऊ दादगाळ, जाहीर खान, संदीप पोगला, शिवा सोळंकी, अंकुश भोंगळे, विजय कुमरे, प्रसाद देशमुख, स्वप्नील बाजुजवार, एकनाथ कोरासे, मंगेश वाघमारे, राहुल वनकर यासह कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस चे विविध विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
शहरातील बहुतांश व्यापारी आपल्या दुकानाच्या जवळच होते. त्यांनी या बंद विषयी नाराजी व्यक्त केली. दर वेळेस व्यापाऱ्यांचीच प्रतिष्ठाने बंद का असा नाराजीचा सूरही व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. राजुरा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.













Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top