Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात दारू व्यसन मुक्तीच्या कार्यापासून झाली - माजी आमदार अँड. संजय धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
प.पूज्य शेषराव महाराज यांचा 21 वा पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम संपन्न आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा -  प.पूज्य शेषराव महाराज व्यसन मु...
  • प.पूज्य शेषराव महाराज यांचा 21 वा पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम संपन्न
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा - 
प.पूज्य शेषराव महाराज व्यसन मुक्ती संघटना गोंडपिपरीच्या वतीने प.पूज्य शेषराव महाराज यांच्या 21 व्या पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशराव चौधरी कू.उ.बा समिती गोंडपीपरी, कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार अँड संजय धोटे, प्रमुख अतिथी अनिल डोंगरे जिल्हा अध्यक्ष प.पुज्य शेषराव महाराज व्यसन मुक्ती संघटना जिल्हा चंद्रपूर, के.डी.मेश्राम तहसीलदार गोंडपीपरी, जे.व्ही राजगुरू ठाणेदार गोंडपिपरि, गणपत चौधरी तालुका अध्यक्ष गोंडपिपरी प.पूज्य शेषराव महाराज, बबनराव निकोडे तालुका अध्यक्ष भाजपा, दिलीप सोळंकी सामाजिक कार्यकर्ता, अविनाश राऊत जिल्हा सचिव, निलेश पुलगमकर तालुका सचिव गोंडपिपरी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सूरवात गोंडपिपरीं शहरातून पालखी, दिंडी व व्यसन मुक्तीच्या जनजागृतीपर फलकानी झाली. मार्गदर्शन पर कार्यक्रमात कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार अँड. संजय धोटे यांनी आपल्या मार्गदर्शनात बोलताना या संघटनेच्या कार्यक्रमात येताना मला अती आनंद होत असून माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात याच कार्यापासून झाली असून या संघटनेशी माझे रक्ताचे नाते जुडले आहे. या संघटनेचे कार्य कसल्याही प्रकारे थांबू नये तसेच संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे शेतकरी, शेतमजूर असून त्यांच्यासाठी मी भविष्यात शेतीला जोडधंदा असा रोजगार उपलब्ध करून देण्या करिता मी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल डोंगरे यांनी संघटनेच्या कार्यानी संपूर्ण जिल्हा वेढला असून हे कार्य दारूच्या आहारी गेलेल्या लोकांच्या घरा घरा पर्यंत पोहचले पाहिजे यासाठी संघटनेचे कार्य जोमात सुरू आहे. तसेच व्यसनाला प्रोत्साहन देणाऱ्या लोकांचे या संघटनेत स्थान नसून अशा लोकापासून समाजातील लोकांनी दूर राहण्याचे आव्हानही त्यांनी या कार्यक्रमा अंतर्गत केले या कार्यक्रमात संगटनेच्या वतीने व्यसनमुक्तीवर व कोविड क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या अधिकारी व पदाधिकारी यांचा शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प.पूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे प्रदेश सचिव संजय बुटले यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या मदत देण्यात आली. या कार्यक्रमात गोंडपीपरी तालुक्यातून बहुसंख्येने संघटनेचे लोक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सचिन फुलझले यांनी केले. कार्यक्रमाच्या यश्वीतेकरिता प.पूज्य शेषराव महाराज व्यसन मुक्ती संघटना गोंडपिपरी चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.







Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top