- संदीप जैन यांच्या खांद्यावर आता व्यापारी असोसिएशनचीही धुरा
- उपाध्यक्षपदी हजभजनसिंग भट्टी तर सचिवपदी संतोष रामगिरवार यांची निवड
राजुरा -
स्थानिक व्यापारी असोसिएशनचे सर्व सभासद मिळून दरवर्षी कोजागिरी साजरी करीत असतात. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे यात खंड पडला होता परंतु शनिवार २३ ऑक्टोबर ला स्थानिक नक्षत्र हॉल येथे कोजागिरी साजरी करण्यात आली. कोजागिरी निमित्य राजुरा व्यापारी असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत संदीप जैन यांची अध्यक्षपदी, हरभजनसिंग भट्टी यांची उपाध्यक्ष तर संतोष रामगिरवार यांची सचिवपदी सर्वसंमत्तीने निवड करण्यात आली.
नवनियुक्त अध्यक्ष संदीप जैन यांनी 'आमचा विदर्भ' शी बोलतांना सांगितले कि, व्यापाऱ्यांनी कोरोना संकटाच्या काळात भरीव कार्य केलेले आहे. याकाळात व्यापाऱ्यांनी शासनाच्या नियमांचे पालन करत भरभरून साथ दिली. भविष्यात जेष्ठ व्यापाऱ्यांच्या मार्गदर्शनात कार्य करत राहू. व्यापाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता प्रयत्न करू.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नप उपाध्यक्ष सुनील देशपांडे हे होते. यावेळी दिनकर डोहे, अमजद खान, गोपाल झंवर, अनिल बरडे, नरेंद्र काकडे, रिजवान अली बंदाली, प्रशांत गुंडावार, दिनकर आकनुरवार, सुभाष रामगिरवार, जहीर लखानी, विष्णूप्रसाद नावंधर, चैनानी बंधू, रमेश सारडा, परवेज अली बंदाली, पूनम शर्मा, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष हितेश डाखरे, अभय पोशट्टीवार, प्रशांत मग्गीडवार, घनश्याम हिंगाने, गणेश रेकलवार, प्रशांत नामेवार, राजू धोटे, प्रशांत माणूसमारे, गोपाल सारडा, अनिल आवारी, कमल बजाज, अमित वर्मा, राधेश्याम सोनी, राजेश बजाज, आनंद चांडक, मिलिंद देशकर, गोविंद साबनानी, किशोर हिंगाने, संतोष देरकर, सुभाष सारडा व शेकडो गणमान्य व्यापारी उपस्थित होते. संचालन जितू देशकर तर आभार रज़ब अली बंदाली यांनी केले. कार्यक्रमात सर्वसंमतीने निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना संस्थेतील सर्व सदस्यांनी पुढील वाटचाली करिता शुभेच्छां देत मावळत्या पदाधिकाऱ्यांनी पदभार सोपवला.
संदीप जैन यांच्या खांद्यावर आता व्यापारी असोसिएशनचीही धुरा
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे संदीप जैन हे सध्या राजस्थानी युवा मंचचे अध्यक्ष सुद्धा आहेत, त्यांनी या आगोदर जवळपास ७ वर्षे राजुरा तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्षपदी भूषवले असून बॅडमिंटन, क्रिकेट खेळामध्येही हे दररोज सक्रिय असतात त्यामुळे ते स्पोर्टिग क्लबचे सक्रिय सदस्य सुद्धा आहे. अश्या सक्रिय व्यक्तिमत्वाची व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने याचा फायदा व्यापाऱ्यांना मिळणार असा विश्वास व्यक्त केल्या जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.