Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: व्यावसायीक वैद्यकीय प्रयोगशाळांना आरोग्य विभागाची नोटीस
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनधिकृत पॅथोलॉजी लॅब वर कारवाई करण्याचे महाराष्ट्र पॅरावैदक परिषद मुंबईचे आदेश अनधिकृत पॅथोलॉजी व रक्त संकलन केंद्रावर होणार कारवाई आमचा विद...
  • अनधिकृत पॅथोलॉजी लॅब वर कारवाई करण्याचे महाराष्ट्र पॅरावैदक परिषद मुंबईचे आदेश
  • अनधिकृत पॅथोलॉजी व रक्त संकलन केंद्रावर होणार कारवाई
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
सद्या सर्वत्र पॅथोलॉजी सेंटर कडून होण्याऱ्या लुबाडणूकीवर नागरिकांडून ओरड होत आहे. संबंधीत क्षेत्रातील अपुरे प्रशिक्षण असतांनाही पॅथोलॉजी सुरू करून रूग्नांच्या जीवाशी खेळ होत अल्याचे प्रकार दैनंदिन जीवनात उघडकीस येत आहे. यावर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पॅरावैदक परिषद, मुंबई कडून सर्व पॅथोलॉजी लॅब, रक्त नमुना संकलन केंद्र आदींची तपासनी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्या मार्फत जिल्हा शल्य चिकीत्सक, वैद्यकीय अधिक्षक यांना देण्यात आले आहे. यामध्ये राजुरा शहरातील दहा रक्त संकलन केंद्रांना नोटीस देण्यात आल्या आहे. 
महाराष्ट्र पॅरावैदक परिषद अनुसूचीमध्ये समाविष्ठ मान्यताप्राप्त मेडिकल लॅबोरेटरी टेक्नालॉजी पदवी, पदवीका व पॅरावैदक परिषदेची नोंदणी नसतांनाही अनेकांनी पॅथोलॉजी लॅब व रक्त संकलन केंद्र थाटले आहे. तसेच कार्पोरेट रक्त संकलन केंद्रांचे तंत्रज्ञ म्हणून घरोघरी जावून रक्तांचे नमुने घेतात व अवास्तव शुल्क आकारून शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्या जात असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. बऱ्याच एम.डी. पॅथोलॉजी डॉक्टरांकडून अप्रशिक्षित व शासनाकडे नोंदणी नसलेल्या व्यक्तींना कमीशन देवून बोगसरित्या या व्यवसायाला बढावा देत असल्याचे महाराष्ट्र पॅरावैदक परिषदेच्या निदर्शनास आल्याने ही तपासणी व कारवाई मोहिम राबविण्यात येत आहे.
राजुरा तालुक्यात दहा पॅथोलॉजी लॅब व रक्त संकलन केंद्रांना वैद्यकीय अधिक्षकांकडून नोटीसा बजावून त्यांचाकडून शैक्षणीक अहर्ता, पॅथोलॉजी नोंदणी प्रमाणपत्र आदींची कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. पॅथोलॉजी व रक्त संकलन केंद्रांच्या संचालकांची सभा घेवून त्यांना नोंदणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येते. याबाबत राजुरा उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे.
राजुरा शहरातील लॅबोरेटरी तंत्रज्ञांनी एम.बी.बी.एस. किंवा एम.डी. पॅथोलॉजीस्ट नसतांनाही थेट पॅथोलॉजी केंद्रांचे फलक लावून सर्वच प्रकारच्या रक्तांच्या बेभाव किंमतीत रक्त तपासण्या सुरू केल्या आहे. ह्या तपासण्याच्या येणाऱ्या रिपोर्ट सदोष असल्याचे अनेकदा बोलल्या जात आहे. मात्र आरोग्याच्या भितीपोटी तक्रारीसाठी कोणी पुढे येत नसल्याने या तंत्रज्ञांचे चांगभल होत असल्याचे दिसून येते. आरोग्य विभागाच्या नोटीशीची दचक घेत अनेकांनी पॅथोलॉजी ऐवजी रक्त संकलन केंद्राचे फलक लावण्यास सुरूवात केली आहे. आरोग्य विभागाने अहवालाच्या फेऱ्यातच थांबून न राहता सक्षमपणे कारवाई करण्याची मागणी राजुरा शहरवासीयांकडून होत आहे.
जिल्हा शल्य चिकीत्सक, चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त आदेशानुसार राजुरा शहरातील लॅबोरेटरीला नोटीसा देवून नोंदणीचे कागदपत्र मागविण्यात आले. त्यानुसार लॅबची तपासणी करून वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर करण्यात आला असून त्यांच्या सुचना प्राप्त होताच पोलीस प्रशासनाची मदत घेवून अनधिकृत लॅबवर कारवाई करण्यात येईल.
- डॉ. लहू कुळमेथे, वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रूग्णालय, राजुरा 





Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top