राजुरा -
राजुरा तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे व त्यांनी परीक्षेत मिळविलेल्या गुणांची कदर व्हावी, त्यांचा गुणगौरव व्हावा यासाठी विक्रमशिला बहुउद्देशिय संस्था तक्षशिला नगर बामणवाडा च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा २९ ऑगस्ट रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विक्रमशिला बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष अमरदिप वनकर तर उदघाटक म्हणून बामणवाडा येथील सरपंच भारती पाल, मार्गदर्शक डाॅ. अभिलाषा गावतुरे, प्रमुख पाहुणे म्हणुन ग्रापं सदस्य तथा विक्रमशिला बहुउद्देशिय संस्थेचे संचालक सर्वानंद वाघमारे, ग्रापं सदस्य सुजाता मेश्राम, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीच्या उपाध्यक्ष मनिषा गावंडे उपस्थित होते.
यावेळी राजुरा शहरातील इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य गुणवत्ता संपादित केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवुन पालकासह गौरव करण्यात आला.
राजुरा शहरातील प्रत्येक हायस्कुल मधून प्रथम येणारे विद्यार्थी तसेच कनिष्ठ महाविद्यालयातुन विज्ञान, कला, वाणिज्य व व्होकेशनल शाखेतून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यात एकुण १७ विद्यार्थी सहभागी झाले. इयत्ता १० वीचे प्राविण्य प्राप्त विद्यार्थी कु. वैष्णवी गाणफाडे, कु. शेख सानिया तबस्सुम शहाबुद्दीन, कु.स्नेहा सोयाम, कु.सुहानी वरारकर, कु दर्शना गेडाम आणि गौरव वाकुडकर यांना गौरविण्यात आले. इयत्ता १२ वी चे प्राविण्य प्राप्त विद्यार्थी कु. सोनाली आंबील ढगळे, कु.धनश्री हेपट, कु.मानषी टेकाम, कु.केतकी ढुमणे, नामदेव देवकते, कु.ज्ञानेश्वरी राऊत, कु.प्रणाली सत्रे, कु.निकिता विद्ये, कु.नंदिनी कोरवते, कुणाल भोंगळे आणि रुक्मिणी बतकमवार यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रमशिला बहुउद्देशिय संस्थेचे सचिव भारत फुलझेले यांनी, संचालन संस्थेचे संचालक धनराज दुर्योधन तर आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष लालचंद वाघमारे यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.