Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वेकोलि ने खुल्या कोळसा खाणी लगतच्या शेतजमिनी संपादित कराव्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
माथरा येथील शेतकऱ्यांनी दिले जिल्हाधिकार्‍यांना निवेदन आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - विकोलि ने सास्ती विस्तारित खुल्या कोळसा खाणी ...
  • माथरा येथील शेतकऱ्यांनी दिले जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
विकोलि ने सास्ती विस्तारित खुल्या कोळसा खाणी लगतच्या मौजा माथरा येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी संपादित करून योग्य व न्याय नुकसान भरपाई मिळवून द्यावी, या मागणी करिता माथरा येथील शेतकऱ्यांनी माजी सरपंच लहू चहारे व अँड. मारोती कुरवटकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना नुकतेच निवेदन दिले. वेकोलि बल्लारपूर क्षेत्र हे सास्ती विस्तारित खुल्या कोळसा खाणी करता माथरा, गोवरी परिसरातील शेतकऱ्याच्या शेत जमिनी संपादित करणार आहे. यासंबंधीची प्रारंभिक अधिसूचना सुद्धा राजपत्रात प्रकाशित झालेली आहे. त्या अनुषंगाने वेकोलि बल्लारपूर यांनी माथरा गोवरी अधिसूचित क्षेत्राची योजना तयार केली असून त्यानुसार परिसरातील संपादन करावयाच्या शेतजमिनी त्याचे स्वरूप इत्यादी नकाशा सहित तयार केलेला आहे. परंतु या खुल्या कोळसा खाणीच्या अगदी आजुबाजुला माथरा येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी असून त्या मात्र वेकोलीने संपादित करण्याची कारवाई अद्यापही केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात अतोनात हाल, अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. कारण ही विस्तारित खान खूली असल्याने वेकोलिकडून वारंवार ब्लास्टिंग केल्या जाणार आहे. त्यामुळे भूगर्भला हादरे बसून त्याचा परिणाम आजूबाजूच्या शेतजमिनीवर होणार आहे. त्यामुळे पीडित शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. तसेच खुल्या कोळसा खाणी मुळे भूगर्भातून काढलेल्या मातीचे ढिगारे पीडित शेतकऱ्यांच्या शेताच्या आजूबाजूला तयार केले जातील. त्या मातीच्या ढिगार्‍यातून पावसाच्या पाण्याने किंवा अन्य कारणामुळेही माती, दगड इत्यादी पीडित शेतकऱ्यांच्या शेतात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच मातीच्या अधिकार्‍यामुळे पिडीत शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता सुद्धा राहणार नाही. अशा परिस्थितीत  शेतकऱ्यांनी शेती कशी करावी हा मोठा प्रश्न आ वासून निर्माण झालेला आहे. याशिवाय खुल्या कोळसा खाणीमुळे संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण होईल. त्याचाही दुष्परिणाम पीडित शेतकऱ्यांच्या शेतीवर व पिकांवर झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच सदर खुल्या कोळसा खाणीमुळे शेतकऱ्यांचा रस्ता सुद्धा बंद होणार आहे. याशिवाय वेकोली माथरा परिसरात नैसर्गिकपणे वाहणारा नाला संपादित करणार असून तो कृत्रिमपणे  वडते करण करण्याची  शक्यता आहे. भविष्यात तसे झाल्यास बॅक  वाटरच्या फटक्यामुळे  माथरा, गोवरी परिसरातील गावांना व शेतीना पुराचा तडाखा बसल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे  वेकोलीने पीडित शेतकऱ्याच्या शेतजमिनी संपादित करून शेतकऱ्यांना योग्य व न्याय नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी द्यावी, या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना देण्यात आले.
यावेळी निवेदन देणाऱ्या  शिष्टमंडळात हरिश्चंद्र चहारे, कानोबा विधाते, महादेव वांढरे, बालाजी चहारे, मारोती कुरसंगे, नवनाथ चोखारे, कवडु वडस्कर, धनराज वाटेकर इत्यादी शेतकऱ्यांचा समावेश होता.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top