Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वन औषधी वनस्पती चे वृक्षारोपण करून आयुर्वेदाचार्य बालकृष्ण यांचा वाढदिवस जडीबुटी दिवस म्हणून साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्यूरो रिपोर्ट्स राजुरा - पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान संघठन, महिला पतंजली योग समिती आणि इतर संघटनेच्या वतीने आयुर्वेदाचार...
आमचा विदर्भ - ब्यूरो रिपोर्ट्स
राजुरा -
पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान संघठन, महिला पतंजली योग समिती आणि इतर संघटनेच्या वतीने आयुर्वेदाचार्य आचार्य बालकृष्ण महराज यांचा वाढदिवस जडीबुटी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. बालकृष्ण यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून स्थानिक वन उद्यानात छोटेखानी कार्यक्रमाचे 
आयोजन करून वन औषधी रोपांचे रोपण करण्यात आले. 
पुरातन काळापासून आपल्या भारतीय संस्कृतीतने आयुर्वेदाचे महत्त्व विशद केले आहे. त्याच अनुषंगाने जडी बुटी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार सुदर्शन निमकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, भाजपा नेते सतीश धोटे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तथा नप शिक्षण सभापती राधेश्यामजी अडानिया, वनपाल प्रकाश मत्ते, भारत स्वाभिमान चे सह जिल्हा प्रभारी एमके सेलोट, वनरक्षक एस.आर. चौबे उपस्थित होते. 
माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी योगा हा आरोग्यासाठी कसा पुरक आहे ते समजावून सांगितले. योग गुरू रामदेव बाबाने योगाचा प्रसार व प्रचार शहरा पासुन तर खेड्यापर्यंत कसा केला, त्यांच्या कार्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जग मान्यता मिळवून दिली तसेच पंतजली योग समिती उत्कृष्ट काम करीत आहे असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात सुदर्शन निमकर यांनी केले. यानंतर उपस्थित अतिथीगंण व योग साधकांनी सामुहिकपणे औषधी वनस्पती लावुन जडी बुटी दिवस साजरा केला. 
संचालन भारत स्वाभिमान तालुका प्रभारी पुंडलिक उराडे, आभार देवीदास कुईटे यांनी केले. प्रसंगी प्रा. हरी डोरलीकर, अँड. मेघा धोटे, जेष्ठ नागरिक सुभाष रामगीरवार, उद्धव लांडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मिलिंद गड्डमवार, अंजली गुंडावार, ओमप्रकाश गुंडावार, नीता बोरीकर, रेखचंद बोरीकर, नलीन झाडे, भावना भोयर, पुष्पा गिरडकर, अनिल चौधरी यांनी परिश्रम घेतले. 









Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top