- आरोग्य यंत्रणेसोबत कोविड चे १००% लसीकरणाचे उद्दिष्ठ साधण्याकरिता चेतन जयपुरकर यांचा पुढाकार
राजुरा -
देशात व राज्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर करण्यावर प्रशासनाचा भर आहे. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमे अंतर्गत टेंभूरवाही गावात कोविड चे 100% लसीकरणाचे उद्दिष्ठ साधण्याकरिता जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव व गावचे उपसरपंच चेतन जयपुरकर यांनी पुढाकार घेत गावातील शिक्षकांना सोबत घेऊन लसीकरणाबद्दल जनजागृती केली. प्रारंभी गावातील नागरिकांना लसीकरणाकरिता राजुरा किंवा देवाडा जावे लागत होते त्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत होता. गावातच लसीकरण केंद्र सुरु व्हावे याकरिता तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना भेटून, निवेदन देऊन गावातच लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी करण्यात आली होती. गावकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देत आरोग्य विभागाने गावात लसीकरण ६ मे २०२१ पासून सुरु केले. आतापर्यंत गावात सहावेळा लसीकरण झाले. जनजागृतीमुळे गावातील नागरिकांनी लसीकरण मोहिमेला उत्तम प्रतिसाद दिला. आता पर्यंत गावातील पहिल्या डोजचे १०० टक्के तर दुसऱ्या डोजचे ६० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
चेतन जयपुरकर यांच्या पुढाकाराने उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता ग्रामपंचायत सदस्य, शाळा शिक्षण समिती सदस्य, जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक वृंद, मुख्याध्यापक बोंडे, आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टर सोनाली करमनकर, आरोग्य सेविका पप्पूलवार, आरोग्य सेविका वानखेडे, आशावर्कर किरण कलास्वार, अंगणवाडी सेविका सौ गेडाम, सौ सुरतेकर, ग्रामसेविका दुधे मॅडम, डाटा ऑपरेटर जगताप, संतोष कुरसंगे, ग्रामपंचायत शिपाई बाळू चौधरी, आकेवार व विविध सामाजिक कार्यकर्त्यांचे वेळोवेळी सहकार्य लाभत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.