- "मजबूत देश - मजबूत महिला" उपक्रम
राजुरा -
महिला आणि मुली यांना ध्येय साध्य करण्यासाठी त्यांचे आरोग्य, शिक्षण, संधी आणि सशक्तिकरण या चार प्रमुख सूत्रांवर भर देऊन आपल्याला कार्य करायचे आहे. महिलांना संघटित करून अधिक शक्तिशाली बनविण्याचे ध्येय असून त्यादृष्टीने वर्षभर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राजुरा इनरव्हील क्लबच्या नवनियुक्त अध्यक्षा स्वरूपा झंवर यांनी केले. देशपांडे वाडी येथील जिम्नॅशियम सभागृहात आयोजित पदग्रहण समारंभात त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा कल्याणी गुंडावार यांनी भूषविले. प्रमुख अतिथी माजी अध्यक्षा सुषमा सुब्बा, कृतीका सोनटक्के, सचिव शुभांगी वाटेकर व्यासपीठावर उपस्थित होत्या. यावेळी वक्त्यांनी कोरोना या महामारीच्या काळात महिलांनी आपल्या सर्व कुटुंबाची काळजी घेत मोठ्या धैर्याने या संकटाचा सामना केला. परंतु अद्यापही हे संकट संपले नसून परत नविन वेरीयंट आल्याने अधिक काळजी घेण्याचे मत व्यक्त केले. 2021 च्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये वेटलिफ्टिंग या खेळात मिराबाई चानू, बॅडमिंटन मध्ये पी. व्ही. सिंधु, बॉक्सिंग मध्ये लवलीना बोरगोहेन या महिलांनी पदक मिळवून देशाचे नाव रोशन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करीत आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात प्राची चिल्लावार यांच्या सुरेल स्वागत गीताने आणि राधा विरमलवार यांच्या सुंदर स्वागत नृत्याने झाली. इनरव्हील प्रार्थना स्मिता बोनगिरवार, प्राची चिल्लावार, स्वाती गादेवार, आसावरी बोनगिरवार यांनी सादर केली. यानंतर अध्यक्ष स्वरुपा झंवर, उपाध्यक्ष वृषाली बोनगिरवार, सचिव शुभांगी वाटेकर, कोषाध्यक्ष कल्याणी मोहरील, आयएसओ राधा वीरमलवार, सीसी अर्पिता नामेवार व घटना समिती अध्यक्ष राधा धनपावडे या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव शुभांगी वाटेकर, संचालन स्नेहा चांडक व आभार प्रदर्शन वृषाली बोनगिरवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अर्पिता नामेवार, राधिका धनपावडे, कल्याणी मोहरील, अर्चना शिंदे, रोशनी झंवर, प्रणिता धाबे, ज्योती जावळे, नेहा चिल्लावार यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.