Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गुणवंत विध्यार्थी हा समाजाचा आधारस्तंभ - नगराध्यक्ष अरुण धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रामनगर कॉलनी येथे गुणवंत विध्यार्थी सत्कार सोहळा आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - गुणवंत विद्यार्थी हा समाजाचा आधारस्तंभ असून कोरोना ...
  • रामनगर कॉलनी येथे गुणवंत विध्यार्थी सत्कार सोहळा
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
गुणवंत विद्यार्थी हा समाजाचा आधारस्तंभ असून कोरोना काळातील विपरीत परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये भरघोस यश प्राप्त केले. त्याचप्रमाणे जीवनाच्या प्रत्येक पायरीवर विद्यार्थ्यांनी आपल्या परिश्रमाने आणि जिद्दीने यशस्वी व्हावे असा अशावाद आणि गौरवोद्गार गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याप्रसंगी सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी काढले.
नगराध्यक्ष अरूण धोटे यांच्या संकल्पनेतून आणि रामबाग समिती यांच्या सहकार्यातून रामनगर कॉलनीतील इयत्ता 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा समाज मंदिर रामनगर कॉलनी येथे आयोजित करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रामनगर कॉलनीतील येथील ज्येष्ठ नागरिक प्रभाकरराव उपगनलावर, सखारामजी बोरकुटे, सुरेशराव सोनटक्के, प्रा.डॉ. संजय गोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रा. डॉ. संजय गोरे यांचा सपत्नीक शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थी कु. केतकी किरण ढुमणे, ओम किरण बरडे, संचित सतीश कुचनवार,कु.अनुश्री किशोर चिंचोळकर, कु.नंदिनी सुनील निमकर,कल्याण सुरेश साळवे,  कु.कृष्णा नंदकिशोर पिल्लारे, गिरीराज संजय चांडक,कु. प्रज्ञा प्रवीण लांडे,अंकित विजयराव लांडे कु.तेजस्वी कुंदा धनवलकर इत्यादी इयत्ता बारावी मध्ये यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकासह पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन नगराध्यक्ष अरुण भाऊ धोटे व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सत्कारमूर्ती डॉ.संजय गोरे यांनी  परिश्रम आणि आत्मविस्वास हीच यशाची गुरुकिल्ली असून कोरोना काळातील विपरीत परिस्थितीत ही विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले हा त्यांचा परिश्रमाचा आणि बुद्धीचा विजय असून पालकांनी आणि नागरिकांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी व शिक्षणासाठी त्यांच्यात आत्मविश्वास आणि मनोबल वाढविले पाहिजे असे आवाहन केले.यावेळी रामबाग येथील चौकीदार सीताराम  यांचा अरुनभाऊ धोटे यांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.  
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन आणि आभार कृतिका सोनटक्के यांनी केले. सत्कार सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी ऍड. प्रशांत अटाळकर, किशोर चिंचोळकर, किरण बरडे, किरण ढुमने, सतीश कुचनवार,  प्रवीण बुक्कावार, रामभाऊ पत्तीवार, प्रशांत नामेवार व इतर रामबाग समितीच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.यावेळी विविध प्रकारच्या अल्पोपहार आणि व्यंजन यांनी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.











Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top