- गोवरीच्या सरपंच सौ. आशाताई उरकुडे यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा
- गावातील विहार, ग्रापं परिसरात वृक्षारोपण
राजुरा -
कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे जगात ऑक्सिजन अभावी कित्येक लोकांना प्राण गमवावे लागले म्हणून वृक्षसंवर्धन गरजेचे आहे. पुस्तक हे मस्तक घडवतं आणि घडलेलं मस्तक हे कधीच कुणापुढे नतमस्तक होत नसतं म्हणून बुके न देता बुक द्यावे, पुष्पगुच्छ ऐवजी वृक्ष द्यावे हे धोरण सर्वांनी राबविले पाहिजे असे प्रतिपादन वाढदिवसाप्रसंगी गोवरी गावच्या सरपंच सौ. आशाताई उरकुडे यांनी केले.
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या गोवरी गावच्या सरपंच्या सौ आशाताई बबन उरकुडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाप्रसंगी ग्रापं परिसरात तसेच गावातील विविध भागात वृक्षारोपण करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. याप्रसंगी शिवसेना राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गोवरी या गावात असंख्य कार्यकर्त्या सोबत हा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी गोवरी या गावचे उपसरपंच उमेश मिलमिले, ग्राप सदस्य नीलिमाताई देवाळकर, नीलमताई कोसूरकर, भीमराव मिट्टूवार,चेतन बोभाटे, सुरेखाताई पाचभाई, सुरेखाताई सोयाम, सिद्धार्थ कासवठे यांच्यासह माजी ग्राप सदस्य अमोल कोसूरकर, गजानन उरकुडे, प्रभाकर इटणकर, ग्राप. कर्मचारी सतीश पाचभाई, रवी मेंढे, मारोती बाविटकर यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.