Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: भानामती जादूटोनाचे संशयावरुन ७ इसमांना बांधून मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पँथर्स रिपब्लिकन पार्टी शाखा बल्लारपूर ने केला निषेध दोषींवर कडक कार्यवाही करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर शशी ठक्कर - आमचा विद...
  • पँथर्स रिपब्लिकन पार्टी शाखा बल्लारपूर ने केला निषेध
  • दोषींवर कडक कार्यवाही करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम तहसील जिवती येथील मौजा वणी खुर्द येथे गावकऱ्यांनी दोन कुटुंबातील ७ महिला व पुरुषांना गावात जादूटोना करतात असा निराधार व अशास्त्रीय आरोप करून गावाचे मध्यभागी भरचौकात दोरखंडाने हात-पाय बांधून मारहाण केली. या घटनेत ५ इसम गंभीर झाले असून, दोन इसम साधारण जखमी आहेत. ५ गंभीर इसम मृत्युशी झुंज देत असून, सर्व जखमीवर जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे उपचार चालू आहे. सदर घटना मानवतेला कलंकीत करणारी असून अत्यंत निंदणीय आहे. पँथर्स रिपब्लिकन पार्टी शाखा बल्लारपूर तर्फे सदर घटनेचा तिव्र निषेध नोंदविण्यात आला. पोलीस विभागाने सदर घटनेची निपक्ष चौकशी करून कोणत्याही राजकीय दबावात न येता, संबंधित आरोपींना जादूटोना प्रतिबंधक कायदा, अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे २४ ऑगस्ट रोजी पँथर्स रिपब्लिकन पार्टी तर्फे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर मार्फत करण्यात आली. निवेदनाची प्रतिलिपी मा. पोलीस अधिक्षक, चंद्रपूर यांना देण्यात आली. शासनातर्फे पीडीत कुटुंबांना न्याय प्रदान न केल्यास पेंथर्स रिपब्लिकन पार्टी तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा ही देण्यात आला आहे. 
निवेदन देतेवेळी शिष्टमंडळात पँथर्स रिपब्लिकन पार्टी चे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष विश्वभूषण धुलकर, चंद्रपूर तालुका अध्यक्ष सुयोग लिहितकर, चंद्रपूर तालुका कोषाध्यक्ष प्रविण बाळके, कृष्णाल मोरे, राहुल डोनेवार तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 







Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top