- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर रोपवाटिकाचे जिप सभापती सुनील उरकुडे यांचे हस्ते उदघाटन
महिला बचत गटाच्या महिलांनी रोपवाटिका उभारण्याचा निर्धार करून दोन लाखाच्या अधिक क्षमतेची वाटिका चे काम पूर्णत्वास आणले. सदर वाटीकेत उच्च प्रतीचे रोपे तयार करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे व त्यात निरंतरता कायम ठेवावी त्यासाठी हवी ती मदत करायला प्रशासन सज्ज असेल असेही याप्रसंगी सुनील उरकुडे यांनी अधिक माहिती देतांना सांगितले.
राष्ट्रीय कृषी विभाग योजनेअंतर्गत राजुरा तालुक्यातील पंचाळा येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका निसर्ग शेतकरी महिला बचत गट यांनी सुंदर अशी रोपवाटिका तयार केली. या रोपवाटीकेचे ऊद्घाटन जिप कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांचे हस्ते नुकतेच संपन्न झाले. याप्रसंगी माजी आमदार निमकर, पंस माजी सभापती व विद्यमान पंस सदस्य सौ. कुंदाताई जेनेकर, उपविभागीय कृषि अधिकारी मोरे साहेब, तालुका कृषी अधिकारी मकपल्ले साहेब, चूनाळाचे उपसरपंच बाळनाथ वडस्कर, चनाखाचे उपसरपंच विकास देवाडकर, पंचाळाचे उपसरपंच आकाश चोथले, भाजपा नेते भाऊराव चंदनखेडे, लक्ष्मण निरांजने, विहरगांवचे माजी उपसरपंच ईर्शाद शेख व निसर्ग शेतकरी महिला बचत गटाच्या सदस्या व गावकरी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.