Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मोदी सरकारचे ७ वर्ष पूर्ण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सेवा दिवसाच्या निमित्याने खामोन्यात फेसमास्क चे वितरण जिप कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकुडे यांचा पुढाकार अनिल गंपावार - आमचा विदर्भ ताल...

  • सेवा दिवसाच्या निमित्याने खामोन्यात फेसमास्क चे वितरण
  • जिप कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकुडे यांचा पुढाकार

अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
केंद्रातील मोदी सरकारने पूर्ण केली आहेत. या निमित्ताने भाजपाने हा दिवस सेवा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच अनुषंगाने जिप कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकुडे यांनी खामोना येथे सदिच्छा भेट दिली. भेटीदरम्यान उपस्थित महिला तथा पुरुषांना फेसमास्क चे वाटप करण्यात आले. कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नियमितपणे फेसमास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे, वारंवार हाथ धुणे या सोबतच कोरोना लसीकरणाबाबत ग्रामीण भागात असणारे गैरसमज दूर करून जनजागृती करण्यात आली. 

याचदरम्यान उपस्थित नागरिकांना महिला स्वयंसहाय्यता गटाचा आढावा घेत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी ग्रामीण भागात कशा निर्माण होऊ शकतात याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिप कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकुडे म्हटले कि, ग्रामीण भागात सुध्दा उद्योगाच्या, व्यवसायाच्या, स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. पण, आपण कधी त्यांच्यांकडे संधी म्हणून बघितलेलेच नाही. त्यासंधी आपण खरोखर हेरल्या, तर वैयक्तिक विकासाबरोबर संपूर्ण गावाचा व गावाबरोबर परिसराचा विकास करण्याची ताकद आपण निर्माण करू शकू. 

मौजा खामोना येथे महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या ग्रामसंघासाठी इमारतीची मागणी महिलांनी केली असता त्यासाठी व्यक्तिशः प्रयत्न करणार असल्याचे सभापती उरकुडे यांनी सांगितले. याप्रसंगी उपसरपंच सौ. शारदा तलांडे, ग्रापं सदस्य मारोती चन्ने, सौ अलका वैद्य, सौ. लक्ष्मी लोणारे, ग्रामसेवक मिलिंद देवगडे, आशा वर्कर सौ. सविता उरकुडे, सीआरपी श्रीमती जयश्री पावडे,  प्रतिष्ठित नागरिक रामदास गिरसावळे, बाबुराव चन्ने, तुळशीराम तलांडे, दिलीप गिरसावळे तसेच मोठ्या संख्येने महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या महिला तसेच गावातील इतर नागरिक तथा युवकवर्ग आवर्जून उपस्थित होते. 








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top