Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: साखरी येथे लसीकरण केंद्र मंजूर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नागरिकांसाठी  झाले सुकर अँड.प्रशांत घरोटे यांच्या पाठपुराव्याला यश अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - भाजपा तालुका महामंत्...

  • नागरिकांसाठी  झाले सुकर
  • अँड.प्रशांत घरोटे यांच्या पाठपुराव्याला यश
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
भाजपा तालुका महामंत्री इंजि. अँड.प्रशांत घरोटे यांच्या पुढाकाराने कोरोना लसीकरण केंद्र मंजूर झाले असून यामुळे नागरिकांची लसीकरणासाठी गावातच  सोय झाली आहे. या लसीकरण केंद्रात साखरी व परिसरातील गावातील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन भाजपा तालुका महामंत्री इंजि.अँड.प्रशांत घरोटे यांनी केले आहे.  

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सदर गावात सुद्धा बाधितांनसोबतच मृत्यू संख्याही वाढली होती. माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या कढोली प्राथमिक आरोग्य केंद्र येथील भेटीदरम्यान साखरी गावात कोरोना मृत्यू संख्या जास्त असल्याबाबत व गावाकडे विशेष लक्ष देण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. याच दरम्यान साखरी येथे लसीकरणाची सोय नसल्याने नागरिकांना गोवरी किंवा कढोली येथे जावे लागत होते. तद्वतच प्रशांत घरोटे यांनी आरोग्य अधिकारी यांच्या समक्ष साखरी येथे लसीकरण केंद्र उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी साखरी येथे लसीकरण केंद्र मंजूर करून देण्याचा सूचना दिल्या होत्या, त्यानुसार वैद्यकीय अधिकारी यांनी साखरी येथे लसीकरण केंद्र मंजूर करत असल्याबाबत आश्वस्त केले. दि. ३ जून पासून लस उपलब्ध करीत असल्याच्या सूचना संवर्ग विकास अधिकारी व कढोली प्राथमिक आरोग्य अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या आहेत. लसीकरण केंद्र मंजूर झाल्याबद्दल अँड.प्रशांत घरोट यांनी माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, वैद्यकीय अधिकारी व प्रशासनाचे आभार मानले आहे. 









About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top