- आतापर्यंत ३० दुकाने सील
- तहसील, नगर परिषद प्रशासन व पोलीस विभागाची संयुक्त कार्यवाही
- व्यापारी धास्तावले ; तरीही लालसेपायी व्यापाऱ्यांकडून नियमांची पायमल्ली
संचारबंदी सुरू असल्यामुळे महसूल, नगर परिषद तथा पोलीस विभागातील पथक यांनी शहरात फेरफटका मारला. शहरातील काही दुकाने नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे लक्षात आले यावेळी पथकाने तात्काळ कारवाई करत दुकाने सील केली यामध्ये पायल जनरल स्टोअर्स, स्नेहदीप गारमेंट्स, नॉव्हेल्टी मॅचिंग, रिवाइंडिंग दुकान, जयलक्ष्मी जनरल स्टोअर्स, ए.एस.के. बूट हाऊस, क्वालिटी बूट हाऊस, प्रगती कलेक्शन, संदीप फुटवेयर, पल्लवी मॅचिंग सेंटर, कलकत्ता किड्स अँड लेडीज ड्रेसेस या प्रतिष्ठानवर कारवाई करून सील करण्यात आले.
कोरोना विषाणूचा संसर्ग तोडण्यासाठी शासनाने नियमावली तयार केली असून याचे सर्वांनी पालन करणे गरजेचे आहे. देशासमोर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आव्हान याप्रसंगी केले. जिल्ह्यात कोरोना संसर्ग प्रचंड वेगाने वाढत असल्यामुळे विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून व्यावसायिकांनी सहकार्य करावे. ही कारवाई तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील प्रशासन, नगर परिषद प्रशासन व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने केली.
कोविडचे कारण सांगून आस्थापणांवर कारवाई केली जात आहे.मग आपत्कालीन परिस्थितीत मिळणारे अनुदान धंदेवाईक लोकांच्या खात्यात कां जमा केले जात नाही आहे ? याचे उत्तर कोण देणार आहेत ? मा.तहसिलदार, उपविभागीय अधिकारी कां जिल्हाधिकारी साहेब ? पाठीवर मारावे पण पोटावर मारू नये.एवढी तरी माणुसकी दाखवा म्हणावे !
उत्तर द्याहटवा