Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: 264A प्रमुख राज्यमार्गावरील काढोली येथे होत असलेले बंधिस्त गटार व पाईप पुलाचे काम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बांधकामात रेती ऐवजी घिसा चे मिश्रण ; बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह विर पुणेकर - आमचा विदर्भ (ग्रामीण) प्रतिनिधी राजुरा - प्रमुख राज्य ...

  • बांधकामात रेती ऐवजी घिसा चे मिश्रण ; बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
विर पुणेकर - आमचा विदर्भ (ग्रामीण) प्रतिनिधी
राजुरा -
प्रमुख राज्य मार्ग 264A दाताळा-हडस्ती-कढोली-पोवनी मार्गाचे काम सुरू आहे. कढोली येथील रस्त्याच्या दोन्ही कडेला काँक्रीट बंधिस्त गटारी चे काम व छोट्या पाईप पुलाचे काम निव्वळ काळ्या माती वरती काँक्रेट पसरुन सुरु आहे. सदर कामात काँक्रीट मध्ये रेती ऐवजी घिसा मिसळवत असल्यामुळे या कामाची गुणवत्ता पूर्णपणे नित्कृष्ट झाल्याची प्राथमिकदृष्टया निदर्शनास येत आहे. सदर काम आता मजबुती राहील कि नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

झालेल्या बांधकामास पाहता त्या बांधकामास हाताने धक्का दिल्यास निर्माण केलेले काँक्रीट ढासळून खाली पडून मातीस मिसळत आहे. या बद्दल गावकऱ्यांनी विचारणा केली असता संबधित कंत्राटदार उडवा उडवी चे उत्तर देत आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजुरा अभियंता बाझारे साहेब यांना मागील दोन महिन्यापासून राकेश हिंगाने सरपंच कढोली (बु) यांनी कामा ची पाहणी करण्यास निवेदन दिले असता त्या निवेदनास दोन महिन्याचा कालावधी लोटू गेला असूनही अजूनही बांधकाम कामाची पाहणी करण्यास ते व कुठलेही संबंधित अधिकारी आलेले नाही. असा आरोप गावकऱ्यांनी लावला आहे. यावरून असा संशय येतो की बांधकाम विभागाच्या संमतीने कंत्राटदार असे काम करत असेल अशी शंका सरपंच राकेश हिंगाने यांनी व्यक्त केली.

कंत्राटदाराला पूर्ण सूट दिली आहे का? अधिकारी स्वतःच्या घराचे बांधकाम याप्रकारे करणार का? हा शासनाच्या पैशाचा अपव्यय नाही तर काय आहे? यांना जाब विचारणारा कोणी नाही का? मागील दोन महिन्यापासून कोणताही अधिकारी कामाची पाहणी करण्यास का आलेले नाही तरी या कामाची चौकशी तातडीने करून उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. 





Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top