- जुना बनावट फेरफार रद्द करण्या बाबतची होती तक्रार
- नप ची कार्यवाही ठंड़बसत्यात
- वारसानाला डावलून पतिपत्नीचे नाव नमूना आठ वर
कुमारी पोर्णिमा फाले - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
सावली -
ग्रापं नमूना आठ हा जागेचा ठोस पुरावा नाही केवळ प्रशासनाकड़े महसुल गोळा व्हावा जेणेकरून गाव विकास साधता येईल म्हणून नमूना आठ वर नावे चढवून कर लावले जाते मात्र नमूना आठ वर नावे असल्याने ती सर्व संपत्ती माझीच आहे कुटुंबातील बाकीच्या सदस्यांचा त्यावर अधिकार नाही अश्या फाजिल आत्मविश्वासावर नेहमी वारसान सोबत वाद, विवाद, भांडण, तंटा करणाऱ्या गैर अर्जदारा विरुद्ध जिल्हाधिकारी साहेब चंद्रपुर यांच्याकडे तक्रार देण्यात आल्यानंतर सदर प्रकारणाची चौकशी करून अहवाल सादर करावा असे फर्मान दिल्या नंतर सदरच्या प्रकारणाची चौकशी न करता केवळ संबंधित गैर अर्जदाराला आपल्या कडील फेरफार बाबत कागद पत्र सादर करावे असे एक पत्र दिल्यानंतर गैर अर्जदार योग्य कागदपत्र सादर करु शकला नाही. त्यासंदर्भात भूमिअभिलेख कार्यालयाचा मुळ रेकॉर्ड हा बाप-आज्याच्या नावे असताना केवळ बनावट कागदपत्र सादर करून आणि तत्तकालीन ग्रापं प्रशासनाला हाताशी धरून तीन बहिनी, दोन भाऊ असे पाच वारसान असताना एका भावाने सर्वाना बेदखल करत नमूना आठ वर स्वता आणि पत्नी असे दोन नावे नमूना आठ वर दर्ज करून ती सर्व संपत्ती माझीच आहे असे सांगत नेहमीच वाद घालत आहे. सदर प्रकरणाबाबत एक वर्षाचा काळ लोटत असतांना काय कार्यवाही करण्यात आली अशी अर्जदाराने विचारना केली असता आता निवडणुका आहेत कोरोनाही सुरु झाला असे सांगन्यात येत आहे. असे अनेक बनावट प्रकरण असून त्याची नमूना आठ नोंद घेण्यात आली असून तत्कालीन ग्राम पंचायतीच्या काळात असे अनेक नावे नमूना आठ वर त्याची नोंद घेण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. तेव्हा विद्यमान नगर पंचायत प्रशासनाने सदर बनावट फेरफार रद्द करून वारसांची नावे नमूना आठ वर दर्ज करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.