Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नागरिक खरेदीसाठी चुस्त, प्रशासन सुस्त, तालुक्यात कोरोना वाढतोय मात्र मस्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चिमुर शहरात कोरोनाचे नियम धाब्यावर, नागरिकांची खरेदी साठी गर्दी मोठा कोरोना उद्रेक झाल्यास जबाबदार कोण...? मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनि...

  • चिमुर शहरात कोरोनाचे नियम धाब्यावर, नागरिकांची खरेदी साठी गर्दी
  • मोठा कोरोना उद्रेक झाल्यास जबाबदार कोण...?
मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चिमूर -
चिमुर शहरात कोरोनाचा विस्फोट होऊन रोज शेकडो नागरिक कोरोना पॉझिटिव्ह सापडत असून मृत्युच्या प्रमाणात सुद्धा दिवसेंदिवस वाढ होत आहे. याकरिता चिमूर शहरातील नागरिक खरेदीसाठी चुस्त असून, प्रशासन मात्र सुस्त, तर कोरोना रोज वाढतोय मस्त.अशी परिस्थिती चिमूर तालुक्याची सद्या दिसून येत आहे...

चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यातील भिसी हा सद्या कोरोना हाट्स्पॉट बनला असून, जिल्ह्यात नंबर १ वर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत जात आहे. चिमूर शहरात सुद्धा तीच परिस्थिती असून, रोज कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहेत. तरी पण नागरिक खरेदीच्या नावावर गर्दी करीत असून, याकडे प्रशासन मात्र अक्षरशा दुर्लक्ष करीत आहेत. जिल्हाधिकारी यांनी आदेश निर्गमित केले असूनही जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला चिमूर प्रशासनाकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे. चिमूर तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असूनही प्रशासन गंभीर दिसून येत नाही आहे. यामुळं प्रशासन गाढ़ झोपेत असून, जागे कधी होणार, असा प्रश्न सुज्ञ नागरिक करीत आहेत...

राज्यात कोरोना महामारीचे संकट ओढावले असताना राज्य सरकार परिस्थिति नियंत्रणात करण्याकरिता सर्वोतपरी पराकाष्टचे अनेक प्रयत्न करीत आहेत मात्र चिमुर शहरात या उलट परिस्थिति निर्माण झालेली दिसून येत आहे. राज्य सरकारनी दिवसा जमावबंदीचे आदेश काढले असतानाही चिमुर शहरात मात्र घोळक्याने नागरिक रस्त्यावर बिनधास्त फिरतांना दिसत आहेत. जीवनाशक वस्तु खरेदी करण्याच्या बहान्याने नागरिक बाहेर निघत आहेत. या प्रकरणाकडे मात्र तहसील प्रशासन, नगर परिषद व तत्सम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. सुजान नागरिक प्रशासनास जेव्हा गर्दी होण्याबद्दल तक्रार करतात तेव्हा तक्रार करणाऱ्यांचे नाव नगर परिषद कडून जाहिर करण्यात येते. अशी तक्रार सुद्धा काही नागरिक करीत आहेत. त्यामुळे तक्रारदारानी तक्रार करायची तरी कोणाकडे..? आणि कशी करायची..? असा प्रश्न निर्माण होतो आहे.

कोरोनाचे काळात लाँकडॉउन सुरु असताना सुद्धा लग्नाची खरेदी जोरात सुरु असून लग्न सुद्धा धूमधडाक्यात वाज्या गाज्यासहित सुरु आहेत अनेक व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाची तपासणी, लसीकरण केलेली नसतानाही ते व्यवसाय करीत आहेत तर पॉझिटिव्ह रुग्ण घराबाहेर पडूंन काम करीत आहेत. मग यावर नियंत्रण करण्यात प्रशासन का अपयशी ठरत असून, प्रशासन कोरोनाबाबद्द गप्प का बसलाय? प्रशासनाला कर्तव्याची जाणीव नाही का? अशी शंका तालुक्यातील सामान्य नागरिकांमधे निर्माण झाली आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष होत राहील तर चिमुर कोरोना रुग्णाचे माहेरघर व चिमुर शहरात मृत्यूचे थैमान घातल्याशिवाय राहणार नाही. याकडे जिल्हाधिकारी यांनी तात्काळ लक्ष देऊन आळा घालावा तसेच प्रशासनातील नागरिक कोरोना प्रादुर्भाव बाबत हयगय करीत आहेत. अश्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे. अशी मागणी सुद्धा नागरिकाकडून केल्या जात आहे. 






Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top