- उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्यावर आणखी तीन गुन्हे दाखल
पोलिस तपासात विनोद शिवकुमार याने दीपाली चव्हाण यांना त्रास दिल्याचे स्पष्ट झाले आहे. दीपाली चव्हाण हीचा गर्भपात झाला होता. तिच्या औषधीचे कागदपत्रे पोलिसांनी प्राप्त केले आहे. तसेच साक्षीदारांचे बयान नोंदविण्यात आले आहे. साक्षीदारांचे बयान, वैद्यकीय कागदपत्रे यांचा पोलिसांनी बारकाईने तपास केला. यात विनोद शिवकुमार याने त्रास दिल्यामुळे दीपाली यांचा गर्भपात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. आरोपी विनोद शिवकुमार दीपाली यांना शिवीगाळ करण्यासोबत निलंबित करण्याची धकमी देत होता. त्याने तिला भयभीत करताना अपमानीत केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम पाटील करीत आहेत.
तपासातील निष्कर्षावरील विनोद शिवकुमार यांच्यावर नव्याने ३१२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबद्दलची माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली आहे. विनोद शिवकुमार यांच्यावर नव्याने गुन्हे दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.