Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: स्व. गणपतराव धोटे यांची आदर्श परंपरा कायम जोपासणार - आमदार सुभाष धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सुभाष धोटेंच्या हस्ते खिर्डी येथे १ कोटी २१ लाखाच्या विकासकामांचे भूमिपूजन अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - गुढीपाडव्याच...

  • सुभाष धोटेंच्या हस्ते खिर्डी येथे १ कोटी २१ लाखाच्या विकासकामांचे भूमिपूजन
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
गुढीपाडव्याच्या शुभमुर्तावर आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते मौजा खिर्डी येथे १ कोटी २१ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन पार पडले. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, राजुरा विधानसभा क्षेत्रात जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपले प्राधान्य असून क्षेत्रात अनेक विकास कामे सुरू आहेत. खिर्डी गावाला विशेष महत्त्व असून स्वं. गणपतराव धोटे यांनी या गावाला आदर्श गाव बनविण्यासाठी कष्ट घेतले आहेत. त्यांनी घालून दिलेली आदर्श परंपरा आपण कायम जोपासणार असून या गावाच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करीत राहू. 

यात सिमेंट नाली बंधारा बांधकाम करणे ३० लक्ष, खिर्डी येथील नाल्यावरील संरक्षण भिंत बांधकाम करणे ५१ लक्ष, दादाजी शेरकींचे घर ते जिल्हा परिषद शाळा पर्यंत नाली बांधकाम करणे १० लक्ष, अशोक मांडवकर ते वासुदेव सोनवणे, बंडू गेडेकर ते अजय बोटरे, अमर हिवरकर ते माता मंदिर व सुग्रीव मत्ते बालाजी गोहणे यांचा घरापर्यंत रस्ता बांधकाम करणे २० लक्ष, खुले व्यामाम शाळा (ग्रीन जिम साहित्य) ७ लक्ष, रस्त्याला दोनी बाजूंनी गट्टू लावणे व सौंदर्यकरणं करणे ५० लक्ष, खर्डी येथील बस स्थानक निर्माण करणे २ लक्ष रुपये या विकास कामांचा समावेश आहे. 

या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, सिंधुताई आस्वले, उपसभापती प स कोरपना, अनुसायताई कोटानाके सरपंच, उत्तमराव पेचे माजी जि. प सदस्य, पुरूषोत्तम राजूरकर उपसरपंच, नंदकिशोर वाढई सरपंच कळमना, मनोहर नैताम, अशोक कुडमेथे, रामदास ढवस, बालाजी शेरकी, विलास मडावी याशिवाय खिर्डी येथील ग्रामस्थ उपस्थीत होते. 






Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top