Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: एप्रिल महिन्याच्या १३ दिवसांत १०५ जणांना कोरोनाने त्यांच्या आप्तेष्टांपासून हिरावले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भंडाऱ्यात धगधगल्या 12 चिता स्मशानशेड अपुरे पडल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार जिल्ह्यात 448 जणांनी गमावले जीव मृतांची वाढती आकडेवारी चिंताजनक बा...

  • भंडाऱ्यात धगधगल्या 12 चिता
  • स्मशानशेड अपुरे पडल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार
  • जिल्ह्यात 448 जणांनी गमावले जीव
  • मृतांची वाढती आकडेवारी चिंताजनक
बाळकृष्ण कडव - आमचा विदर्भ प्रतिनिधी
भंडारा -
कोरोनामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना बाधितांप्रमाणे मृत्यूंचे प्रमाणही चिंताजनक पातळीवर आहे. एप्रिल महिन्याच्या १३ दिवसांत १०५ जणांना कोरोनाने त्यांच्या आप्तेष्टांपासून हिरावले आहे, तर ११ हजारांवर नागरिकांना कोरोनाने ग्रासले. मंगळवारी भंडारा येथील स्मशानभूमीत एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मागील पाच दिवसांत तब्बल ६७ जणांनी आपले जीव गमावले आहेत. संसर्ग झपाट्याने वाढत असला तरी नागरिकांमध्ये अद्यापही जागरूकता पाहिजे त्या प्रमाणात नसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर होताना दिसून येत नाही. भंडारा शहरानजीक असलेल्या करचखेडा (भिलेवाडा) पुनर्वसन येथील स्मशानभूमीत जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृत पावलेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४४८ व्यक्ती दगावल्या आहेत.

कर्मचाऱ्यांवर वाढला ताण
मागील १३ दिवसांत कोरोनामुळे १०५ जणांनी आपला जीव गमावला आहे. मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पालिका कर्मचाऱ्यांवर आहे. मृतदेह रुग्णवाहिकेत टाकण्यापासून ते स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिकेने १४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. महिनाभरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या झपाट्याने वाढल्याने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती वाढली आहे.

नातेवाइकांचा एकमेकांना धीर
कुटुंबातील कर्त्या माणसांना, कुटुंबाचा आधारवड असलेल्या वृद्धांना या कोरोनाने हिरावून नेले आहे. मृत्यूनंतर कुटुंबीयांना त्यांचे शेवटचे दर्शनही दुर्लभ झाले आहे.े मृत पावलेल्या व्यक्तीच्या आठवणींना उजाळा देत पाणावलेल्या डोळ्यांनी नातेवाइकांना एकमेकांना धीर द्यावा लागत आहे. अंत्यसंस्कारावेळी कुटुंबातील आप्तेष्ट किमान ५०० फूट दूर अंतरावरून त्याचे शेवटचे दर्शन घेत मोठ्या अंत:करणाने घराकडे परतताना दिसत आहेत. 






Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top