भद्रावती -
तुम्हाला २५ लाखाची लाॅटरी लागली असून पहिले १० हजार रुपये आमच्या खात्यावर जमा करा असा संदेश पाठवून येथील एका युवकास लुबाडल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
येथील बंगाली कॅम्प निवासी युवक रमजान रशिद शेख याला एका अज्ञात इसमाने व्हिडिओ पाठवला. त्या व्हिडिओमध्ये तुम्हास केबीसी व्हाॅटस् अप क्रमांकावर २५ लाखाची लाॅटरी लागली आहे. त्यासाठी तुम्ही आमच्या क्रमांकावर फोन करुन आम्ही सांगतो त्या खाता क्रमांकावर १० हजार रुपये जमा करा. १० हजार जमा होताच २० मिनिटांनी तुमच्या खात्यावर ही रक्कम ट्रान्सफर होईल व त्याची पावती पाठवली जाईल. त्यामुळे तुमचे रजिस्ट्रेशन होईल व शासनाकडून तुमचा धनादेश पास होईल असेही त्या व्हिडिओद्वारे सांगण्यात आले.तसेच सदर व्हिडिओमध्ये एक धनादेश आणि फाईल दाखविण्यात आली आहे.त्या धनादेशावर बॅंकेच्या अधिकाऱ्याचा शिक्का आणि स्वाक्षरी दाखविण्यात आली आहे. विशेष म्हणजे तुमचा विश्वास बसावा याकरीता धनादेश आणि फाईल तुम्हाला पाठवित असल्याचे सदर व्हिडिओमध्ये म्हटले असून ज्यांना या लाॅटरीचा लाभ मिळाला आहे, त्यांचेसुद्धा व्हिडिओ पाठवित असल्याचे म्हटले आहे. तसेच असे तीन व्हिडिओसुद्धा रमजानच्या व्हाॅटस् अप वर पाठविण्यात आले. ते व्हिडिओ पाहून रमजानचा विश्वास बसला व त्याने १० हजार रुपये त्या भामट्याने सांगितलेल्या खात्यात जमा करुन टाकले. २० मिनिटे झाले तरी ना त्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले ना पावती मिळाली. त्यामुळे रमजानने लगेच त्या भामट्याला फोन केला. मात्र तिकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने भद्रावती पोलिस ठाणे गाठले. परंतू तेथे त्याला आम्ही काही करु शकत नाही असे उत्तर मिळाले. त्यामुळे अशी घटना कोणाच्याही सोबत घडू नये असे त्याने आमचा विदर्भच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.