राजुरा -
राजुरा तालुक्यातील स्मार्ट ग्राम, मंगी (बु) येथे दिनांक 12 मार्च 2021 ला स्मार्ट ग्राम मंगी (बु) च्या वतीने शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांची जयंती मोठया उत्साहात संपन्न झाली. सर्वप्रथम शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाकेचे प्रतिमेचे पुजन करुन पुष्पमाला अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावपाटील सोमाजी पा. कोडापे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे माजी सदस्य भिमराव पुसाम, ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुरामजी तोडासाम, ग्रा.पं. मंगी (बु) चे उपसरपंच वासुदेव चापले, जेष्ठ नागरिक पैकुजी पा. मडावी, जलपत पा. कोडापे, यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अरविंद कोडापे यांनी केले. या कार्यक्रमासाठी भाऊराव सिडाम, प्रकाश वेडमे, रामभाऊ तलांडे, शंकर कन्नाके, प्रभाकर मडावी, विश्वेश्वरराव मरस्कोल्हे, चंदूजी तोडासे, शामराव कन्नाके, ज्ञानेश्वर आडे, बिरशाव परचाके, माधव कुमरे, पुंजाराम गेडाम, आनंदराव मडपती, जयपाल मडावी, भिमराव कन्नाके, गणपत चापले, किसन कोडापे, रामशाव कन्नाके, शंकर तोडासे, गणपत कोडापे, मेंगोराव कोडापे, शरद पुसाम, बालाजी गेडाम, माधव कुमरे, पंकज वेडमे, श्रीकृष्ण तोडासाम, सोनु कुमरे, नितीन मरस्कोल्हे, वसंत सोयाम, बालाजी गेडाम, रामशाव कुळमेथे, पंकज मरस्कोल्हे, प्रशांत कोडापे, संतोष कोडापे, मारोती कन्नाके, रमेश कोडापे, धर्मा पुसाम, नामदेव सोयाम, प्रविण कोटनाके, रवी कुळसंगे, विनोद आत्राम, सुरेश आडे, नमन तोडासे यांनी मोलाचे सहकार्य केले. गावात आनंदमय वातावरण निर्माण झाले.


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.